ठाणे: विक्रमगड येथील महाराष्ट्र राज्य विद्युत सहाय्यक अभियंता आरोपी लोकसेवक संदीप जवाहर वर्ग दोन (४९) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना ताब्यात घेतले आहे.
आरोपी लोकसेवक संदीप जवाहर विक्रमगड (जिल्हा पालघर) येथे राहतात. ते मूळचे जबलपूर मध्य प्रदेश येथील आहेत. या प्रकरणातील तक्रारदार यांनी त्यांच्या वडिलांच्या नावे नवीन दोन वीज मीटर कनेक्शनसाठी सेक्शन कार्यालय महावीर, महावितरण विभाग विक्रमगड यांच्याकडे अर्ज केले होते. त्या अर्जानुसार स्थानिक वायरमन यांनी स्थळ पाहणी रिपोर्ट तयार करून लोकसेवक संदीप जवाहर सहाय्यक अभियंता यांच्या कार्यालयाकडे सादर केला आहे.
त्या अर्जावर कारवाई करण्यासाठी आलोसे जवाहर यांनी तक्रारदार यांच्याकडे आठ हजार लाचेच्या रकमेची मागणी केली होती व त्याबद्दल तक्रारदार यांनी 22 जुलै 2024 रोजी पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाकडे तक्रार दिली.
तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आज 22 जुलै 2024 रोजी पंचायतसमोर जवाहर यांनी लाचेच्या रकमेची मागणी केली. त्याची पडताळणी केली असता तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे नवीन दोन वीज मीटर कनेक्शनसाठी 22 जुलै 2024 रोजी आलोसे यांनी आठ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.
तक्रारदाराकडून आठ हजार रुपये लाचेची रक्कम अधिकारी खानावळ पंचायत समितीसमोर जव्हार रोड विक्रमगड येथे सायंकाळी साडेसातच्या दरम्यान पंच साक्षीदार यांच्या समक्ष स्वीकारली असता संदीप जवाहर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पालघर कार्यालयाच्या सापळा पथकाकडून रंगेहात पकडण्यात आले आहे.