लोकल-मेलमध्ये बॅग-मोबाईल चोरणाऱ्या चोरास अटक

साडेचार लाखांचा ऐवज जप्त

कल्याण : लोकल ट्रेन आणि मेल गाड्यांमध्ये प्रवाशांच्या बॅग आणि मोबाईल चोरणाऱ्या एका चोरट्याला अटक केल्यानंतर जीआरपीच्या एसटीएफ गुन्हे शाखेच्या पथकाने चार लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

रंगाराम चौधरी असे पकडलेल्या चोरट्याचे नाव असून तो मूळचा राजस्थानचा आहे. जीआरपी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्शुद्दीन शेख यांनी सांगितले की, रंगाराम चौधरीला १७ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. पोलिस कोठडीत चौकशीदरम्यान कल्याण आणि ठाण्यातील चार गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच रंगारामच्या सांगण्यावरून पोलिसांनी तीन लॅपटॉप, तीन मोबाईल फोन आणि दोन कॅमेरे जप्त केले असून, त्याची किंमत चार लाख ३० हजार ९९९ रुपये आहे. सध्या या प्रकरणाचा तपास जीआरपी एसटीएफचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णराव चव्हाण हे आरोपींना ताब्यात घेऊन करत आहेत.