कोरोनानंतर अनेकांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे आपले घर आता आपले कार्यालय बनले आहे. घरात ऑफिससाठी जागा असणे गरजेचे आहे. एक अशी जागा जिथे आपल्याला शांततेत काम करण्यास मिळू शकेल. या लेखात आपण घरातील कोणताही एक कोपरा वापरून, त्याला एक आकर्षक आणि उपयोगी कार्यालयीन जागा कशी बनवावी हे पाहणार आहोत. आपण कसे योग्य फर्निचर निवडावे, सजावट कशी करावी आणि कामाच्या गरजेनुसार जागेचा वापर कसा करावा याचीही माहिती घेऊ.
१) घरामधील ऑफिससाठी कोणती जागा योग्य आहे?
– घराच्या आकारानुसार, घरातील सदस्यांच्या संख्येनुसार- वन बीएचके असेल तर लिविंग रूम मधील स्पेस तुम्ही वापरू शकता. टू बीएचके किंवा त्यापेक्षा जास्त मोठे घर असल्यास एखाद्या बेडरूमचाही वापर तुम्ही ऑफिस म्हणून करू शकता.
२) ऑफिसची रचना व स्पेस मॅनेजमेंट कशी करावी?
* प्रथम ऑफिसची रचना करताना व्यवसायाचे स्वरूप काय आहे हे लक्षात घ्यावे लागेल.
* जागेच्या मर्यादा असल्यामुळे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त गोष्टींचा अंतर्भाव कसा करता येईल हे पहावे.
* ऑफिसमध्ये एक एक्झिक्युटीव्ह आणि कमीत कमी दोन व्हिझिटर्स चेअर्स असाव्यात.
* जागा प्रशस्त व मोकळी दिसण्यासाठी शक्यतो ग्लास पार्टिशनचा वापर करावा.
* फ्लोर टाइल्स कमीत कमी चार बाय दोन किंवा दोन बाय दोन घ्याव्यात तसेच त्या लाईट कलर मध्ये असाव्यात.
* कार्पेट किंवा विनाईल फ्लोरिंगही आपण त्या ठिकाणी वापरू शकतो.
* मर्यादित जागेत ऑफिस बनवायचे असल्याने शक्यतो हाईट पूर्ण ठेवावी किंवा फॉल्स सीलिंग करायचे झाल्यास ते कमीत कमी जागेत करावे आणि प्लेन स्वरूपाचे डिझाईन असावे.
* पुरेशी जागा असल्यास टेबलला साईड टेबल आणि मर्यादित स्वरूपाचे स्टोरेज कपाटही तयार करता येऊ शकते.
* ऑफिस बनवताना मर्यादित स्वरूपाच्या फर्निचर सोबत त्या फर्निचरचा रंग हलका- गडद असावा.
* शक्यतो मोकळे व सुटसुटीत फर्निचर असावे. मॉड्युलर फर्निचर असल्यास जास्त उत्तम.
* ऑफिसमधील भिंतीचे व फॉल सिलिंगचे कलर हे लाईट स्वरूपाचे असावेत. शक्यतो व्हाईट, क्रीम असे रंग आपल्याला फॉल सीलिंग किंवा भिंतींना देता येतील.
3) लाईट अरेंजमेंट :
* घरातील ऑफिसमध्ये लाईटची अरेंजमेंट करताना सीलिंगला शक्यतो एलईडी पॅनल लाईट वापरावेत.
* सोबत डेकोरेटिव्ह पर्पजसाठी सीओबी, ब्रॅकेट लाईट आपण लावू शकतो.
* गरज वाटल्यास प्रोफाइल पट्टीमध्ये स्ट्रीपलाईट वापरून आपण तीन कलरमध्ये सुद्धा वापरून मुड लाईटचा वापर करू शकतो.
* ऑफिसची शांतता आणि प्रायव्हसी मेंटेन करण्यासाठी ऑफिसचे डिझाईन प्लॅनिंग करताना ते कोणत्याही परिस्थितीत जाण्या -येण्याच्या मार्गात असू नये याची काळजी घ्यावी.
* तसेच संपूर्ण ग्लास किंवा पार्टिशनचा अर्धा भाग सॉलिड व अर्धा भाग आपण ग्लास वापरून बनवू शकतो.
* ऑफिसचे डिझाईन कंटेम्पररी असल्यास अतिउत्तम, त्यात हलकी डार्क रंगसंगती वापरू शकतो.
* भिंतीवरील शोपीस वापरून ऑफिसची शोभा वाढवू शकतो.
* ग्लास पूर्णपणे ट्रान्सपरंट न ठेवता फिल्म लावून त्याला सुंदर बनवू शकतो.
* ऑफिसचे टेबल सजवताना त्यालाही निरनिराळे ऑप्शन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यामध्ये लॅमिनेट, विनियर वापरू शकतो.
* चेअर मध्येही अनेक ब्रँड आहेत, जसे सायंटिफिक चेअर उपलब्ध आहे. हाय बॅक, रिलॅक्स चेअर, हँडल, विदाऊट हँडल असे अनेक प्रकार आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.
•चेअरसाठी रीवोल्विंग मिडबॅक चेअर किंवा लो बॅक चेअर उपलब्ध आहेत.
४) ऑफिसची रचना करताना एनर्जी सेव्हींग कशी करू शकता?
* शक्यतो क्रॉस व्हेंटिलेशन किंवा खिडकीजवळ ऑफिस असल्यास कमीत कमी वेळ लाईट लावण्याची गरज पडू शकेल.
* जर लाईट लावायचे असल्यास ते एलईडी पद्धतीचे लावल्यास एनर्जी सेव्हिंग होईल. •ऑफिसची जागा किती आहे त्यानुसार किती व्हॅट लाईट लावावेत हे ठरते. शक्यतो १०’X ८’ ऑफिस असल्यास 12/15 व्हॅटचे चार एलईडी लाईट सुद्धा पुरेसे आहेत.
* लाईट्समध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार उपलब्ध असून वर उल्लेख केल्याप्रमाणे एलईडी पॅनल लाईट स्पॉटलाईट्स, सीओबी लाईट, ब्रॅकेट लाईट निरनिराळ्या होल्टेज नुसार आणि डिझाइन्समध्ये वेगवेगळ्या आकारातही हे लाईट उपलब्ध आहेत.
५) घरात ऑफिस बनवताना आपले पर्सनल लाईफ डिस्टर्ब होऊ नये याची काळजी घ्यावी थोडक्यात प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ दोन्ही वेगळे ठेवणे महत्त्वाचे आहे.
* लिविंग रूममध्ये ऑफिस केल्यास येणारा व्हीजिटर हा बाहेरच व्यावसायिकाची भेट घेऊन जाऊ शकतो. जेणेकरून तुमच्या घरच्यांची पर्सनल लाईफ डिस्टर्ब होणार नाही.
* ग्लास पार्टिशनने छोटेसे केबिन तयार केल्यास तुम्हालाही प्रायव्हसी मिळेल व घरच्या इतर सदस्यांनाही त्रास होणार नाही.
६) टेक्नॉलॉजी किंवा अँप्लायन्सेस बाबत विचार करताना ऑफिसमध्ये सर्व अत्याधुनिक सुविधा करणे गरजेचे आहे. जसे की, कॉम्प्युटरसाठी व्यवस्था, लॅपटॉप, मोबाईल चार्जर, एसीची व्यवस्था, ऑटोमॅटिक स्प्रे एअर फ्रेशनर व्यवस्था, समोरील भिंतीवर प्रेझेंटेशनसाठी टीव्ही किंवा स्क्रीनची व्यवस्था करणे गरजेचे आहे.
* वायफाय म्हणजे इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि इन्वर्टर दोन गोष्टी आजच्या तारखेला महत्त्वाच्या आहेत.
* फर्निचरमध्ये सुद्धा वेगवेगळे इम्पॉर्टंट हार्डवेअर उपलब्ध आहेत जेणेकरून कपाटांचे दरवाजे, ऑफिसचा दरवाजा हे सॉफ्ट क्लोजिंग होऊ शकते.
* अत्याधुनिक प्रकारचे वेगवेगळया डिझाईनचे डोअर क्लोजर हँडल्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. आपण आपल्या रिक्वायरमेंटनुसार व बजेटनुसार आपण ते खरेदी करू शकतो. थोडक्यात सांगायचे झाल्यास घरात ऑफिस थाटताना घरातील योग्य जागेची निवड, स्पेस मॅनेजमेंट, योग्य रंगसंगती तसेच योग्य प्रकाश योजना, घरातील व्यक्तींची, आपली प्रायव्हसी मेंटेन करून अत्याधुनिक प्रकारच्या फर्निचरने सजावट करणे तसेच घर आणि ऑफिस याच्यामध्ये योग्य विभाजन करून ऑफिसमध्ये वापरणाऱ्या वस्तू कशा एनर्जी सेव्हींग आणि टेक्नॉलॉजीला अनुसरून घेता येतील याचा विचार होणे गरजेचे आहे. यातून ऑफिससाठी योग्य, पोषक वातावरण निर्मिती कशी निर्माण करता येईल याच्यावर भर देण्यात यावा.
महेश पेडणेकर
इंटिरियर डिझायनर
9820199428
A -१ फर्निचर सेंटर
ठाण्यातील हे फर्निचरचे प्रसिद्ध दुकान असून येथे घरच्या घरी ऑफिस तयार करण्यासाठी लागणारे सर्व फर्निचर मिळते. यात रिवॉलिंग चेअर्स, ऑफिस टेबल, लॉकर्स इ. मध्ये अनेक प्रकार मिळतात. लाकडी व एम एस प्रकारात हे फर्निचर उपलब्ध आहे.
कुठे – जिल्हापरिषद कार्यालय शेजारी, ठाणे
वूड पेकर
या दुकानात घरी ऑफिस स्पेस तयार करण्यासाठी लागणारे फर्निचर मिळते. यात विविध प्रकारच्या ऑफिस चेअर्स, व्हिजिटर्स चेअर्स, टेबल्स, स्टोरेज टेबल्सचा समावेश आहे. येथे ४ हजार रुपयांपासून ४० हजार रुपयापर्यंतच्या रेंजमध्ये फर्निचर मिळते.
कुठे – तलावपाळी समोर, ठाणे