तरुणांच्या स्वप्नातील घर खरेदीसाठी “ठाणे” उत्तम पर्याय

स्वतःचे घर घेणे हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. अलिकडच्या काळात घर खरेदी करण्यामध्ये तरुणांचा कल मोठ्या प्रमाणात दिसून येतो आहे. परंतु आजचे तरुण केवळ घर शोधत नाहीत; ते त्यांच्या जीवनशैली, महत्त्वाकांक्षा आणि स्वप्नांना पूरक असे घर शोधतात. तरुणांना घरे खरेदीसाठी काय हवे आहे? तसेच एखाद्या ठिकाणी व्यवसाय भरभराटीला येतो आणि नोकऱ्या वाढतात. अशा ठिकाणी तरुणांना त्यांच्या महत्त्वाकांक्षी गरजा पूर्ण करणारे, त्यांच्या बजेटमध्ये बसणारे घर हवे असते. या सर्व मुद्यांचे सकारात्मक उत्तर ठाणे आहे, असे जेव्हीएम स्पेसेसचे ‘जेननेक्स्ट’ संचालक निमित मेहता सांगतात.

निमित मेहता यांनी प्रॉपर्टी तज्ज्ञ कमलेश पांड्या यांच्याशी केलेल्या संभाषणामध्ये तरुणांच्या स्वप्नातील घराविषयीचे मत व्यक्त केले आहे.

तरुण घर खरेदीदार आणि ठाणे यांचा काय संबंध आहे?

तरुण खरेदीदारांसाठी, ठाणे हे एक उत्साही आणि दमदार रिअल इस्टेट मार्केट आहे. ज्यामध्ये किंमती आणि बजेटमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ठाण्यातील रिअल इस्टेट विविध पर्यायांसाठी आणि किंमतीनुसार सुरक्षित बाजारपेठ आहे. अलिकडच्या काळात कमी वयातील घर खरेदीदारांद्वारे चालू असलेल्या प्रकल्पांमधील नवीन सुविधा तसेच नवीन लॉन्चला सातत्याने प्राधान्य दिले जात आहे.

तुमच्या कंपनीबाबत तुमची घोषणा काय असेल?

लाइफस्टाइल उंचावण्यासाठी जेव्हीएम स्पेसेस हा एक उत्तम पर्याय आहे. आज आपण ज्या वेगवान जगात राहतो, त्यात सोयीसुविधांविषयी आपण कधीच गांभीर्याने विचार करत नाही जेव्हीएम स्पेसेसचा संचालक म्हणून माझी दृष्टी ही घरे बनवण्यापलीकडे आहे. आमच्या रहिवाशांना आधुनिक राहणीमानाचा उत्तुंग अनुभव घेता येईल याची खात्री करून आराम, लक्झरी आणि सुविधा एकत्रितपणे देऊन एक जीवनशैली तयार करण्याकडे माझा कल आहे.

जेव्हीएम स्पेसेस प्राइम लोकेशन्सवर प्रकल्प हाती घेते का?

स्थान किंवा ठिकाण हा कोणत्याही रिअल इस्टेट प्रकल्पाचा अत्यंत महत्वाचा भाग असतो. जेव्हीएम स्पेसेसमध्ये आम्ही आवश्यक सुविधा प्रदान करणारी जागा काळजीपूर्वक निवडतो. आमचे प्रकल्प हे धोरणात्मकदृष्ट्या रुग्णालये, बाजारपेठा, मॉल्स आणि शाळांजवळ स्थित आहेत, ज्यामुळे आमचे रहिवासी त्यांचे दैनंदिन जीवन अत्यंत सहजतेने व्यतीत करू शकतात. महत्त्वाच्या पायाभूत सुविधांशी असलेली ही जवळीक केवळ वेळेची बचत करत नाही तर जीवनाचा दर्जा देखील वाढवते, ज्यामुळे प्रत्येक प्रवास आनंददायी होतो.

तुमच्या प्रकल्पांमध्ये सर्वसामान्यांच्या आवाक्यातील लक्झरी घरे उपलब्ध होतात का?

जेव्हीएम स्पेसेसच्या प्रकल्पांमध्ये प्रचंड किमतीची लक्झरी घरे असू नयेत असे आम्हाला वाटते. अधिकाधिक लोकांना मूल्यवान जीवनाचा आनंद अनुभवता येईल याची खात्री करून परवडणाऱ्या किंमतीत उच्च श्रेणीतील राहण्याची जागा ग्राहकांना देणे यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आमचा प्रत्येक प्रकल्प आलिशान सुविधा आणि उच्च प्रतीचा डिझाइन केलेला आहे, ज्यामुळे लक्झरी राहणीमान सोपे होते.

तुमचे प्रकल्प स्थापत्यकलेतील चमत्कारामुळे लँडमार्क बनत आहेत का?

सौंदर्यशास्त्र आणि कार्यक्षमता हा आमच्या योजनेचा मुख्य गाभा आहे. आम्ही अत्युच्च गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करतो जे केवळ वेगळेच ठरत नाही तर ते लँडमार्क देखील बनतात. आमच्या इमारती आकर्षक वास्तुशिल्पकलेतून डिझाइन केल्या आहेत जे भविष्यातही आधुनिकतेशी जुळवून घेतात. यातून हे सुनिश्चित करते की आमचे प्रकल्प केवळ घरे नाहीत तर शहरे रमणीय बनवणारी संरचना आहे.

तुमच्या प्रकल्पातील पोडियम पार्किंग आणि मोकळ्या जागांबद्दल काही सांगाल का?

शहरात पार्किंग ही एक महत्त्वाची समस्या झाली आहे. जेव्हीएम स्पेसेसमध्ये सोयीस्कर रॅम्प प्रवेशासह पोडियम पार्किंग तयार केले जाते. हे डिझाइन केवळ ऐसपैस जागा उपलब्ध करून देत नाही तर सुरक्षितताही वाढवते. ज्यामुळे रहिवासी पुरेपूर वापर करू शकतात. याव्यतिरिक्त, आम्हाला मोकळ्या जागांचे महत्त्व समजत असल्याने रहिवाशांना निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा आनंद मिळावा यासाठी आमच्या प्रकल्पांमध्ये मोकळ्या जागा दिल्या जात आहेत. या मोकळ्या जागा मुलांसाठी खेळण्याचे गार्डन आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी चालण्यासाठी डिझाइन केल्या आहेत.

तुम्ही प्रशस्त फ्लॅट आणि आतील उंचीबाबत उल्लेख करता. त्याबद्दल सांगाल?

जेव्हीएम स्पेसेसमध्ये फ्लॅट किमान 10.5 ते 11 फूट उंचीचे आहेत, ज्यामुळे मोकळेपणा आणि भव्यतेची जाणीव निर्माण होते. उंच जागा केवळ सौंदर्याचा आकर्षण वाढवतात असे नाही तर स्वच्छ हवा आणि नैसर्गिक प्रकाश देखील देतात, ज्यामुळे राहण्याची जागा अधिक आकर्षक आणि आरामदायक बनते.

घराच्या बाल्कनीबद्दल काय सांगाल?

रहिवाशांना त्यांचे घर न सोडता ताज्या हवेचा आनंद घेता येईल, अशा योजना केलेल्या बाल्कनी आम्ही रहिवाशांना उपलब्ध करून देतो. या बाल्कनीमध्ये एक अशी जागा आहे जिथे कोणी आराम करू शकतो आणि घराबाहेरचा आनंद घेऊ शकतो. शिवाय, आमचे सर्व प्रकल्प असे डिझाइन केलेले आहेत, की रहिवाशांना सर्व बाजूंनी निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेता येईल.

हे सारे आपण थोडक्यात कसे सांगाल?

जेव्हीएम स्पेसेसमध्ये आम्ही रिअल इस्टेटमधील सोयी सुविधांच्या संकल्पनांना नवीन आयाम देत आहोत. आमचे प्रकल्प सर्वसमावेशक जीवनाचा अनुभव देण्यासाठी वचनबद्ध आहेत. यामध्ये सुविधा, लक्झरी आणि उत्तम डिझाइन यांचा समावेश आहे. येथे रहिवाशांच्या गरजा आणि इच्छांना प्राधान्य देऊन, केवळ घरेच नव्हे तर सर्वोत्कृष्ट जीवनशैली बनवणे हे उद्दिष्ट आहे. तरुण वर्गाला घर खरेदी करण्यासाठी ठाणे हे एक आदर्श मालमत्ता केंद्र आहे आणि जेव्हीएम स्पेसेस हे जेननेक्स्टसाठी ‘ड्रीम होम’ तयार करण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे.

– कमलेश पांड्या
प्रॉपर्टी तज्ज्ञ