इमारत जुनी झाली आणि मोडकळीस येण्यास सुरुवात झाली अथवा सोसायटीमधील पार्किंग समस्या सोडवण्यासाठी वा लिफ्टची समस्या असल्यास स्थानिक रहिवाशांच्या मनात इमारत पुर्नविकासाचा विचार मनात येऊ लागतो. मग रहिवाशांची बिल्डर शोधण्यासाठी शोधाशोध सुरु होते. मात्र जो विकासक इमारतीच्या पुनर्विकासाचे काम हाती घेईल तो वेळेवर काम पूर्ण करेल का? विकासक दर्जेदार काम करेल का ? पुनर्विकासाला जेवढा वेळ लागेल तेवढा काळ विकासक आपल्या मेंबर्सना भाडे देईल का ? असे अनेक प्रश्न जुन्या इमारतीच्या रहिवाश्यांना भेडसावतात. अशा रहिवाशांसाठी ओजस गोविंद ग्रुप हे एक आशादायी नाव ठरतंय !
ठाण्यातील बिल्डिंग पुनर्विकास स्पेशालिस्ट म्हणून ओजस गोविंद ग्रुपच्या समीर अजित गानू आणि सुमेध मिलिंद पाटणकर यांचे नाव अग्रणी आहे. २०१६ साली स्थापन झालेल्या ओजस गोविंद ग्रुप या संस्थेने आतापर्यंत जवळजवळ साडेतीन लाख फुटांचे पुनर्विकास प्रकल्प ओसी सकट पूर्ण केले आहेत. जवळपास ५०० हून अधिक कुटुंबांना ह्या संस्थेने पुनर्विकास करून परत आपापल्या हक्काच्या घरात परत आणले आहे. ही कुटुंबे आज अगदी आनंदाने आपल्या हक्काच्या पुनर्विकसित घरांमध्ये वास्तव्य करीत आहेत.
ओजस गोविंद ग्रुपने सर्वप्रथम पाचपाखाडी स्थित पारिजात इमारत २२ महिन्यांमध्ये पूर्ण केली ह्या इमारतीमध्ये मूळ ३० मेंबर होते. ह्या सर्व मेम्बर्सच्या सहकार्याने इमारत विक्रमी वेळात पूर्ण करून एकूण जुने आणि नवीन अशा ५५ कुटुंबांना २२ महिन्यात ताबा दिला. नंतर चरई स्थित महाश्वेता, यशआनंद, तीन पेट्रोल पंप जवळील पौलोमी व महाजंत सोसायटी भास्कर कॉलनीतील पद्मनाभ अशा अनेक इमारती एका मागोमाग एक ओजस गोविंद ग्रुप पूर्ण करीत गेले. प्लॅन पास झाल्यापासून १८ महिन्यांमध्ये इमारत पूर्ण करून ओसी घेऊन जुन्या रहिवाशांना इमारतीमध्ये परत आणण्याचा कंपनीचा नियम आहे.
समीर अजित गानू सांगतात की, प्रकल्प व्यवस्थापकांच्या मार्गदर्शनाखाली टेंडर प्रक्रिया पूर्ण करून विकासक म्हणून नेमणूक झाल्यावर खऱ्या अर्थाने पुनर्विकासाला सुरुवात होते. हातात घेतलेले पुनर्विकासाचे काम चोख आणि उत्तम दजाचे करायचे हे तत्व कंपनीचं असल्याचं सुमेध पाटणकर सांगतात. इको फ्रेंडली मटेरियल इमारतीच्या बांधकामाकरीता वापरून इमारतीच्या बांधकामाचा दर्जा वाढवला जातो. कोविड काळातही सगळ्या प्रकारच्या आव्हानांवर मात करत कंपनीने आर्थिक शिस्त सांभाळत इमारतींची कामे पूर्ण केली. कोविड काळात अनेक अडचणी होत्या मात्र या काळातही कामगारांना पूर्ण पगार देऊन कोणतीही आर्थिक अडचण येऊ न देता अथवा एकही रहिवाहाशाचे भाडं न थकवता केवळ १८ महिन्यांमध्ये काम पूर्ण केल्याचे समीर गानू अभिमानाने सांगतात.
सध्या ओजस गोविंद ग्रूपचे नौपाड्यात ३ प्रोजेक्ट चालू आहेत :
१) गोखले रोडवरील अवंतिका –
RERA no. P५१७०००४८९६२
ह्या इमारतीमध्ये २ bhk व ३ bhk फ्लॅट्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
२ bhk चे फ्लॅट्स हे ६२५ ते ७५० स्वेअर फूट आणि किंमत १.४ कोटीपासून पुढे.
३bhk चे फ्लॅट्स हे ८५० ते १००० स्वेअर फूट असून किंमत १.९० कोटीपासून पुढे आहे.
ह्या इमारतीची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे :
१. ठाण्यातील मध्यवर्ती अशा गोखले रोड स्थित ही इमारत आहे.
२. सर्व फ्लॅट्स हे वास्तूशास्त्रनुसार बांधले आहेत.
३. इको फ्रेंडली मटेरियलचा वापर.
४. रूफ टॉप अँमेनिटीचा वापर आहे.
५. सीसीटीव्ही, ऍक्सेस कंट्रोल देखील आहे.
६. पार्किंगची सोय.
७. सर्व फ्लॅट हे हवेशीर आणि भरपूर उजेड.
८. ऑगस्ट २०२४ मध्ये ही इमारत पूर्ण होईल.
२) नौपाड्यातील भास्कर कॉलोनी येथील लक्ष्मीनारायण सोसायटी –
RERA NO P५१७०००४९१६९
ह्या इमारतीमध्ये २ bhk फ्लॅट्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
२ bhk फ्लॅट्स हे ५९० ते ७०० स्वेअर फूट आणि किंमत १.३ कोटीपासून पुढे
ह्या इमारतीची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे :
१. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेपासून २ मिनिटांवर.
२. शाळा, हॉस्पिटल, कॉलेज अगदी जवळ.
३. पार्किंगची सोय.
४. CCTV चा वापर.
५. सर्व फ्लॅट हवेशीर आणि भरपूर उजेड.
६. २०२४ च्या वर्षाअखेरपर्यंत ही इमारत पूर्ण होईल.
३) नौपाड्यातील भास्कर कॉलोनी येथील श्रीकृष्ण गोविंद प्रसाद सोसायटी –
ह्या इमारतीमध्ये १ bhk, २ bhk आणि ३ bhk फ्लॅट्स उपलब्ध आहेत.
१ bhk हे ४५० स्वेअर फिट ते ५१० स्वेअर फूट आणि किंमत १.१० कोटीपासून पुढे
२ bhk हे ६२५ स्वेअर फूट ते ७०० स्वेअर फिट आणि किंमत १.४० कोटीपासून पुढे
३ bhk हे ९२५ स्वेअर फिट ते १०५० स्वेअर फट आणि किंमत २.१० कोटीपासून पुढे
ह्या इमारतीची वैशिष्ट्य :
१. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेपासून २ मिनिटांवर.
२. शांत गजबजाटापासून देऊ असा, रहिवाशी योग्य असा परिसर.