उन्हाळ्याची सुट्टी आता ठाण्यात करा मजेशीर !
या उन्हाळ्यात ठाण्यातील या वॉटरपार्कला नक्की भेट द्या
उन्हाळा सुरू झाल्यावर सुट्टीत मुले फिरण्याचा खूप हट्ट करतात. अशा वेळी ठाण्यात जवळच चांगल्या स्थळांना भेट देण्यासाठी बरेचजण प्लॅन बनवत असतात. अंगाची लाही करणारा उन्हाळा विसरून जाण्यासाठी वॉटर पार्कला गर्दी झालेली दिसते. मुलांना पाण्यात खेळणं, वॉटर स्पोर्ट्स करणं, रेन डान्समध्ये भिजणं आवडतं. त्यामुळेच सुट्टीच्या सिझनमध्ये वॉटर पार्कला लोक भेट देतात. ठाण्यात राहत असलेल्या लोकांना तर हाकेच्या अंतरावर वॉटरपार्क उपलब्ध आहेत. नेहमीच्या रुटिनमध्ये वेळ मिळत नाही. असे असले तरी विकेंड आणि लाँग सुट्ट्या असताना वॉटर पार्क भरलेले असतात. तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांना सुट्टीचा आनंद घेण्यासाठी ठाण्यात अनेक सर्वोत्तम वॉटर पार्क आहेत. जिथे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत मजा करू शकता. चला तर मग माहिती घेऊया वॉटरपार्कची…
१) टिकुजी नी वाडी – टिकुजी नी वाडी रिसॉर्ट आणि वॉटर पार्क हे ठाणे जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट वॉटर पार्क्सपैकी एक आहे. येथे अनेक वॉटर राइड्स, वेव्ह पूल्स, गो – कार्ट रिंगण, रोलर कोस्टर, आर्केड क्षेत्र आणि जायंट व्हीलचा आनंद घेऊ शकता. हे वॉटरपार्क 20 एकर परिसरात उभारले गेले आहे. हे वॉटरपार्क नैसर्गिक हिरवळीत विसावले गेले आहे. या ठिकाणी येऊन तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एक अविस्मरणीय अनुभव घेऊ शकता. हे वॉटरपार्क ‘UFO राइड’ साठी लोकप्रिय आहे.
गो-कार्टिंग, बंपर-बोट्स, डायनासोर वर्ल्ड, 9 डी ॲडव्हेंचर, मत्स्यालय आणि फार्म यासारखे इतर अनेक उपक्रम आणि आकर्षणे येथे आहेत. येथे मुलांसाठी किड्स पूल ही आहे. टिकुजी-नी-वाडी निसर्गदृष्ट्या आणि मौजमजेसाठी एक आवडते ठिकाण म्हणून प्रसिद्ध झाले आहे. टिकुजी नी वाडी परिसरात अनेक ड्राय राइड्स आणि उपक्रम उपलब्ध आहेत. या पार्कमध्ये संपूर्ण कौटुंबिक मनोरंजनासाठी डॅशिंग कार, गो कार्ट आणि वर्म कोस्टर सारख्या राइड्स आहेत. टिकुजी नी वाडी मनोरंजन उद्यानात लहान मुलांसाठी खास राइड्स आहेत. क्लाइंबिंग कार, फ्रॉग राईड आणि पायरेट बोट यांचा त्यात समावेश आहे. मुले प्ले स्टेशनवर मजेदार गेम देखील वापरून पाहू शकतात.
वेळ – सकाळी 9 ते सायंकाळी 6.30
पत्ता – टिकुजी नी वाडी, टाटा पॉवर हाऊस समोर, मानपाडा, टिकुजी नी वाडी रोड, चितळसर, ठाणे, महाराष्ट्र 400605
२) सुरज वॉटरपार्क – ठाण्यातील सूरज वॉटर पार्क हे विशेषतः उन्हाळ्यात आवर्जून पाहण्यासारखे ठिकाण आहे. हे वॉटर पार्क 11 एकर जागेवर बांधले गेले आहे. हे वॉटरपार्क खंडातील सर्वात लांब फायबरग्लास बोगद्यासाठी ओळखले जाते. या वॉटरपार्कमध्ये ९ आश्चर्यकारक स्लाइड्स उपलब्ध आहेत. धडकन सबके दिल की, डिंग डाँग सिंग सॉन्ग, लबक झबक मटक स्लाइड, उलट पॅलट, वेव्ह पूल, रिम-झिम बारिश हॉल, हर हर गंगा, रेम्बो स्लाइड या स्लाइडस् आहेत. या वॉटर पार्कची 103 फूट उंचीची फायबर गुहा ही जगातील सर्वात मोठी मानवनिर्मित गुहा आहे.
वेळ – सकाळी 10 ते संध्याकाळी 6
पत्ता – सुरज वॉटरपार्क, एमएच एसएच ४२, डोंगरीपाडा, ठाणे पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र 400615
३) B K रिसॉर्ट आणि वॉटरपार्क – ठाण्यातील B K रिसॉर्ट आणि वॉटरपार्क हे विशेषतः उन्हाळ्यात आवर्जून पाहण्यासारखे ठिकाण आहे. येथे विविध प्रगत आधुनिक वॉटर गेम्स आणि अनेक स्लाइड्स आहेत. विशेष म्हणजे येथे ९० डिग्री स्लाईड आणि पावसात नाचण्याचा आनंद घेण्यासाठी रेन डान्स आहे. या ॲडव्हेंचर वॉटर पार्कमध्ये तुम्हाला प्रसन्न वातावरण मिळेल. या पार्कमध्ये संपूर्ण कौटुंबिक मनोरंजनासाठी अनेक राईट्स आहेत.
शुल्क – प्रौढ – ८००₹
लहान मूल – ६००₹
वेळ – सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत
पत्ता – B K रिसॉर्ट आणि वॉटरपार्क, कोकण किंग रेस्टॉरंट जवळ, पडले- डायघर रोड, कल्याण- शिळ महामार्ग, पडले गाव, ठाणे
४) अम्मू वॉटरपार्क –
अम्मू वॉटरपार्क हे विशेषतः उन्हाळ्यात आवर्जून पाहण्यासारखे ठाण्यातील ठिकाण आहे. येथे विविध प्रकारच्या 10 वॉटर स्लाइड्स आहेत. मुलांसाठी खास पूल तयार करण्यात आला आहे, जो फक्त मुलांसाठी डिझाइन केलेला आहे. येथे इन-हाउस डीजेही आहे. पावसाचा आनंद अनुभवत नाचण्यासाठी रेन डान्सही येथे आहे. हिरवागार परिसर आणि जवळून वाहणारी नदी, हे वॉटर पार्क प्रसन्न वातावरण प्रदान करते. पूलमध्ये पोहण्यापासून ते तुमच्या जोडीदारासोबत वॉटर राइडपर्यंत सर्वांच्या मदतीने तुम्ही दिवसभर येथे मौजमजा करू शकता.
शुल्क – वयोगट ३ ते १० – ४००₹
प्रौढ – ६०० ₹
पत्ता – अम्मू वॉटरपार्क, आपटी रोड, कल्याण मुरबाड रोड जिल्हा ठाणे, वाहोली
५) पॅराडाईज फनलँड –
ठाण्यातील पॅराडाईज फनलँड हे विशेषतः उन्हाळ्यात आवर्जून पाहण्यासारखे ठिकाण आहे. येथे पाण्याच्या अनेक स्लाइड्स, 3 स्विमिंग पूल, एक मशरूम पूल आणि उत्कृष्ट संगीतासह मजेदार रेन डान्स उपलब्ध आहेत. मेरी गो राउंड, लँडस्केप लॉन आणि एक्सप्रेस मिनी ट्रेन्ससह अलीकडेच वॉटर प्लेस्टेशन जोडले गेले आहे जे तुमचा सर्व ताण दूर करेल. या रिसॉर्ट वॉटरपार्कचे प्रमाण, स्वच्छता, विलक्षण वातावरण तसेच त्याचे सौंदर्य ही त्याच्या लोकप्रियतेची कारणे आहेत.
शुल्क – लहान मुलांचे १०००₹
प्रौढ १२००₹
वेळ – सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत
पत्ता – पॅराडाईज फनलँड, पडघा टोल प्लाझा जवळ, भिवंडी बाय पास रोड, पडघा, ठाणे