उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. उन्हाळ्यात घर थंड राहण्यासाठी आपण विविध उपाय करतो. या दिवसात तापमान वाढते, त्यामुळे या महिन्यात घर थंड आणि आरामदायी ठेवणे गरजेचे असते. अगदी सोप्या काही टिप्सच्या मदतीने आपण आपले घर हवेशीर आणि थंड ठेऊ शकतो.
नैसर्गिक घटकांचा समावेश करा
उन्हाळ्यात घरातील हवा ताजी राहण्यासाठी व घर नैसर्गिक दिसण्यासाठी हँगिग प्लांटस् चा वापर करू शकता. त्याचबरोबर ताज्या फुलांचा वापरही करू शकता. याने घरातील हवा खेळती राहून वातावरण थंड राहील.
भिंती हलक्या रंगाने रंगवा
उन्हाळ्यात घरातील भिंती हलक्या रंगाने रंगवा. यासाठी पेस्टल वा पांढरा रंग हे उत्तम पर्याय आहेत. हे रंग सूर्यप्रकाश आणि उष्णता अधिक प्रमाणत परावर्तित करतात. फिकट रंग वातावरण थंड करण्याचे काम करतात.
डी क्लटरिंग (घरातील अनावश्यक वस्तू टाळा)
तुमच्या घरातील असलेल्या अनावश्यक वस्तू टाळा. यामुळे बाहेरील हवा घरात खेळती राहते व वातावरण थंड होते.
बिछाना बदला
तुमच्या बेडरुममध्ये थंड वातावरण निर्माण करण्यासाठी तुमच्या हिवाळ्यातील जड पलंगाची अदलाबदल करा. कापूस किंवा तागाच्या चादरी सारख्या पर्यायांची निवड करा. यासाठी कूल रंगांना पसंती द्या. जसे की, फिकट निळा, गुलाबी इ. रंग उष्ण हवामान थंड आणि आरामदायी ठेवण्यास मदत तर करतील त्याचबरोबर बेडरूम फ्रेश दिसेल.
क्रॉस वेंटीलेशन तयार करा
एअर कंडिशनर (एसी) चा वापर केल्याने तुम्हाला जास्त वीजबिल येऊ शकते. तुमच्या घरात येणारी ताजी हवा खेळती ठेवण्यासाठी खिडकीजवळ टेबल फॅन लावून क्रॉस वेंटिलेशन करू शकता. त्यामुळे सुध्दा वातावरण थंड राहण्यास मदत होते. थंडाव्यासाठी पंख्यासमोर बर्फाची वाटी ठेऊ शकता.
कूल रंगांचा जास्तीत जास्त वापर करा
फिकट (कूल) कलर पेंट मुळे घरात थोडा गारवा जाणवू शकतो. यात प्रामुख्याने निळा, हिरवा, जांभळा ह्या रंगाचा समावेश होतो.
गडद ॲक्सेसरीस स्वॅप आऊट करा
उन्हाळ्यात ज्याप्रमाणे काळा व गडद रंग परिधान करणे टाळले जाते त्याप्रमाणे उन्हाळ्यात गडद ॲक्सेसरीने तुमचे घर सजवणे टाळा. गडद वस्तू हलक्या वस्तूंपेक्षा जास्त उष्णता शोषून घेतात, त्यामुळे उन्हाळ्यात तुमची खोली थंड ठेवण्यासाठी हलक्या रंगाच्या वस्तूंना जास्त प्राधान्य द्या.
-विदुला दीक्षित आणि मृगांक दीक्षित
आर्किटेक्ट आणि होम डेकोरेटर्स, ठाणे.
पडद्यांना नवीन रूप द्या
उन्हाळ्यात घर थंड ठेवायची गरज असते. ज्याने आपले उष्णतेपासून संरक्षण होऊ शकते. हलक्या रंगाचे आणि हलक्या कापडाचे पडदे तुम्ही घरात लावू शकता. तसेच फ्लोरल प्रिंट सारख्या नवीन प्रिंट्सचाही वापर करता येऊ शकतो
उन्हाळ्यात घरात थंडावा निर्माण करण्यासाठी शक्य असल्यास वाळ्याचे पडदे वापरा. वाळ्याच्या पडद्यांवर पाणी शिंपडल्यानंतर त्याला भेदून येणारी हवा घरात अधिक थंडावा निर्माण करते. वाळ्याच्या पडद्याचे अनेक फायदे आहेत.
१) इको फ्रेंडली
घराघरात हल्ली ए. सी. असतातच पण ते आरोग्यास हानिकारक असतात. तरुणवर्ग सोडला तर कमीजास्त प्रमाणात एसीचा दुष्परिणाम हा वयोवृद्ध, गरोदर महिला, नवजात शिशु, श्वसनाचे विकार असलेल्यांनी अपायकारक आहे. वाळ्याचे पडदे हे घरात गारवा निर्माण करण्यासाठी उत्तम आहेतच आणि अपाय काहीही नाही, सर्वांसाठी हे उपयुक्त असतात.
२) मेंटेनन्स फ्री
कोणतही यंत्र यात नसल्यामुळे बिघाड, दुरुस्तीची गरज नाही व धुण्याचीही गरज नसते.
३) पाण्याची बचत करण्यासाठी वॉटर स्प्रे वापरला तर अत्यंत कमी पाण्यामध्ये वाळ्याचा पडदा सतत ओला ठेवता येतो.
वाळ्याचे पडदे तुम्ही नजीकच्या दुकानात किंवा ऑनलाईनही खरेदी करू शकता.
नवीन पडद्यांच्या कलेक्शनसाठी नक्की भेट द्या:
अकेशा – या दुकानात उन्हाळ्यासाठी उपयुक्त असे पडद्याचे नवीन कलेक्शन आलेले असून यात विविध रंगाचे पडदे जसे की, कॉटन, सिल्कचे पडदे, नविन प्रिंट्स, नवीन पॅटर्न उपलब्ध आहेत.
कुठे – पाचपाखाडी, ठाणे
ॲट वन्स – या दुकानात विविध रंगांचे, वेगवेगळया फॅब्रिकचे उन्हाळ्यासाठीचे पडदे उपलब्ध आहेत.
कुठे – गोखले रोड, ठाणे
फाइन कलेक्शन – या दुकानात उन्हाळ्यासाठी उपयुक्त असे कूल रंगांचे पडदे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर नवनव्या प्रिंट्सचे पडदेही यांच्याकडे मिळतात.
कुठे – शिवाजी पथ, ठाणे