ठाणे: शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या ठाणे आणि कल्याण येथे तोफ धडाडणार आहे.
कल्याण लोकसभेचे उमेदवार वैशाली दरेकर राणे यांच्या प्रचारार्थ डोंबिवली येथील भागशाळा मैदानावर तर ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी गडकरी चौक, डॉ. मूस रोड येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला शिवसेना नेते खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह इंडिया महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.