उल्हासनगर: उल्हासनगर मनपाचे वादग्रस्त नगररचनाकार प्रकाश मुळे यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. मनपा आयुक्त अजीज शेख यांनी कार्यालयीन आदेश दिले आहेत.
चुकीच्या पद्धतीने इमारतीचे नकाशे मंजूर करणे, प्रशासनाची मंजुरी नसताना खाजगी कर्मचाऱ्यांना नेमून स्वतःची कामे करणे असा ठपका ठेवून त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.
प्रकाश मुळे यांनी नगररचनाकार म्हणून कार्यभार सांभाळल्यापासून त्यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. याबाबत मनपा आयुक्त अजीज शेख यांनी चौकशी करण्याचे आदेश मनपा प्रशासनाला दिले होते. या संदर्भात अहवाल आयुक्तांना प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.