जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या १० गॅरंटी
नवी दिल्ली: 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीच्या वतीने देशातील जनतेला 10 गॅरंटी दिल्या आहेत. यासोबतच जनतेने आम आदमी पक्षाला केंद्रात निवडून दिल्यास देशाचा विकास 10 वेगवेगळ्या मार्गांनी होईल, असा दावाही त्यांनी केला आहे.
देशात 24 तास वीजपुरवठा होईल. देशाची सर्वाधिक मागणी दोन लाख मेगावॅट आहे. तीन लाख मेगावॅट वीजनिर्मिती करण्याची आमची क्षमता आहे, मात्र खराब व्यवस्थापनामुळे वीजपुरवठा खंडित होतो. आपचं सरकार आल्यावर देशातील गरिबांना मोफत वीज दिली जाईल. एका वर्षात सव्वा लाख कोटींचा खर्च येईल जो सरकार देईल. गरिबांना 200 युनिट वीज मोफत दिली जाईल.
देशभरातील प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण दिले जाईल. सरकारी शाळांचा स्तर उंचावला जाईल. देशातील सर्व सरकारी शाळा उत्कृष्ट बनवणार. हे काम पूर्ण करण्यासाठी पाच लाख कोटी रुपये लागणार आहेत. यासाठी दरवर्षी पाच लाख कोटी रुपये खर्च होणार आहेत. अर्धा खर्च केंद्र आणि अर्धा राज्य सरकार उचलणार आहे.
मोहल्ला क्लिनिक देशभरात उघडले जातील. यामध्ये गरीब आणि श्रीमंत दोघांसाठी उपचार मोफत असतील. उपचाराचा दर्जा जागतिक दर्जाचा असेल. जो काही खर्च असेल तो सरकार उचलेल. चीनने आपल्या देशाच्या जमिनीवर कब्जा केला आहे पण केंद्र सरकारला हे वास्तव लपवायचे आहे. आपल्या सैन्यात खूप ताकद आहे. चीनच्या ताब्यातील भारतातील सर्व जमीन मोकळी केली जाईल. एकीकडे राजनैतिक पातळीवरही काम केले जाईल आणि लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिले जाईल. अग्निवीर योजना बंद करेलअग्निवीर योजना चार वर्षांनंतर आपल्या तरुणांना काढून टाकते. अशा परिस्थितीत आपण लष्कराला कमकुवत करत आहोत. त्यामुळे ही योजना बंद करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या पिकाचा दर निश्चित केला जाईल. केंद्रात सरकार स्थापन झाल्यास दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देऊ. वर्षभरात दोन कोटी रोजगार निर्माण होतील. सर्व तरुणांना सरकारी नोकऱ्यांसाठी तयार केले जाईल. भाजपचे वॉशिंग मशीन चौकाचौकात उभे केले जातील आणि ते तोडले जाईल. प्रामाणिक लोकांना तुरुंगात पाठवण्याची आणि भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देण्याची सध्याची योजना रद्द केली जाईल. संपूर्ण देश भ्रष्टाचारमुक्त होईल. भारत सरकार देशातील उद्योगपतींना मदत करेल. आपल्या देशातील अनेक मोठे उद्योगपती आपले व्यवसाय बंद करून परदेशात गेले आहेत, यामुळे देशाचे नुकसान होत आहे. देशामध्ये ज्याला व्यवसाय करायचा आहे तो करू शकतो.