जिल्ह्यात खरी लढत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी

ठाणे, कल्याण, भिवंडीत १००हून जास्त अर्ज

ठाणे : जिल्ह्यातील लोकसभेच्या तीन जागांकरिता शंभरपेक्षा जास्त उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून ६ मे रोजी उमेदवारी मागे घेण्याची तारीख आहे. त्यानंतर चित्र स्पष्ट होणार असले तरी खरी लढत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यामध्येच होणार आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याचा आज अखेरच्या दिवशी 23 उमेदवारांनी 26 नामनिर्देशन अर्ज दाखल केले असून आजपर्यंत 36 उमेदवारांनी एकूण 43 नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत.

कल्याण लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या पाचव्या व शेवटच्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 19 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. आजपर्यंत एकूण 34 उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात आली आहेत, अशी माहिती 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये धुळे यांनी दिली आहे.