कल्याण : हिंदू नवीन वर्ष गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बेलग्रेव स्टेडियमवर कल्याण डोंबिवलीतील तसेच रीजन्सी अनंतम मधील रासा ग्रुपच्या खेळाडूंनी भारतीय पोशाखात खेळ खेळून हिंदू नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात केले. हिंदू संस्कृती प्रमाणे स्टेडियमवर रांगोळी देखील काढण्यात आली होती. अनेकांनी आपापल्या कलादेखील यावेळी सादर केल्या.
रीजन्सी ग्रुप आणि डावखर फाउंडेशनच्या माध्यमातून एशियातले सर्वात मोठे पिकल बॉल स्टेडियम डोंबिवली मध्ये साकार करण्यात आले आहे. ऑलम्पिक मध्ये कल्याण डोंबिवली येथील खेळाडू असावा या उद्देशाने हे स्टेडियम सुरू करण्यात आल्याचे डावखर फाउंडेशनचे संतोष डावखर यांनी सांगितले.
पिकल बॉल स्टेडियम मध्ये जास्तीत जास्त सहा कोर्ट असतात पण डोंबिवलीतील बेलग्रेव या पिकल बॉल स्टेडियम मध्ये आठ कोर्ट आणि चार पॅवेलियंस आहेत. जलद गतीने वाढणारा खेळ म्हणून पिकलबॉल या खेळाकडे बघितले जाते. बॅडमिंटन आणि टेनिस या खेळाचे कॉम्बिनेशन म्हणजे पिकल बॉल. हा खेळ इनडोअर आणि आउटडोर पॅडल खेळ आहे. ज्यामध्ये दोन खेळाडू (एकेरी) किंवा चार खेळाडू (दुहेरी) खेळू शकतात. पिकल बॉल खेळण्याची पद्धत टेनिस सारखीच असते आणि कोर्ट बॅडमिंटन कोर्टच्या आकाराचे असते. स्मृतिभंश आणि डोळ्यांचा लुकेमिया टाळण्यासाठी पॅडल किंवा रॅकेटचा वापर करून खेळणारे खेळ खेळावे असा सल्ला दिला जातो. जसे की बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि आता पिकल बॉल देखील.
2022 मध्ये वॉशिंग्टनचा अधिकृत राज्य खेळ म्हणून पिकल बॉल या खेळाला मान्यता मिळालेली आहे. स्पोर्ट्स अँड फिटनेस इंडस्ट्री असोसिएशनने 5 दशलक्ष खेळाडूंसह या खेळाला युनायटेड स्टेट्स मधील सर्वात वेगाने वाढणारा खेळ म्हणून नाव दिल आहे. या खेळाचा आता जगभर प्रसार होत असून अमेरिकेतले खेळाडू, कलाकार, राजकारणी हा खेळ आवर्जून खेळतात. खास करून फिट राहण्यासाठी पिकल बॉल हा खेळ खेळला जातो. कारण कोणत्याही प्रकारची दुखापत या खेळात होत नाही. 10 ते 60 अशा सर्व वयोगटात हा खेळ खेळला जातो. प्लास्टिक बॉल आणि लाकडी पॅडल चा वापर या खेळासाठी केला जातो. जगभर चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे पुढच्या दोन वर्षात ऑलिंपिक मध्ये देखील या खेळाचा समावेश होणार आहे.