आमदार रमेश पाटील यांचा विशेष निधी
ठ ा णे : क ो प र ी त ी ल सिद्धार्थनगरमधील रहिवासी आणि वर्षानुवर्षे जुने कपडे विक्रीच्या व्यवसायातून उपजीविका करणाऱ्या नागरिकांना सामाजिक कार्यक्रम
व व्यवसायासाठी हक्काचे एसी सभागृह उपलब्ध झाले आहे. भाजपाचे आमदार रमेश पाटील यांच्या सहकार्याने माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांच्या प्रयत्नांतून ही योजना साकारली.
गेल्या ४० वर्षांपासून कोपरी येथे जुन्या कपड्यांची खरेदी-विक्री करण्याचा व्यवसाय सुरू आहे. या व्यवसायावर शेकडो कु टुबं ांची उपजीविका चालते. मात्र, या विक्रेत्यांना हक्काची जागा उपलब्ध होत नव्हती. त्यांच्याकडून रस्त्यालगत व्यवसाय सुरू होता. तर काही वेळा फे रीवाल्यांविरोधात होणाऱ्या कारवाईत ते भरडले जात
होते. अल्प उत्पन्नावर गुजराण करणाऱ्या या विक्रेत्यांकडून माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्याकडे जागा उपलब्ध
करण्याची मागणी के ली जात होती. तर सिद्धार्थनगरमधील रहिवाशांकडून सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृहाची मागणी होत होती. त्यानुसार माजी नगरसेवक भरत चव्हाण यांनी भाजपाचे आमदार रमेश पाटील यांच्याकडे आगरी-कोळी समाजाचे नेते कै . बबनराव शिंदे सभागृहासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याची मागणी के ली होती. त्यानुसार आमदार पाटील यांनी निधी उपलब्ध के ल्यामुळे आता संपूर्ण सभागृह वातानुकूलितके ले जाईल. तर तळमजल्यावर कपडे विक्रेत्यांसाठी जागा उपलब्ध के ली जाईल. त्यामुळे या विक्रेत्यांवर कारवाईची टांगती तलवार दूर होणार आहे. तर सिद्धार्थनगरवासियांना हक्काचे एसी सभागृह उपलब्ध होणार आहे. या संदर्भात महाराष्ट्र जुने कपडे विक्री संघ युनियनच्यावतीने भरत चव्हाण व ओमकार भरत चव्हाण यांची भेट घेऊन आभार मानण्यात आले.