वन खात्याच्या मंजुरीअभावी जुळा बोगदा डोंगरपार जाईना

ठाणे : केंद्रीय वन खात्याची मंजुरी अद्याप न मिळाल्याने ठाणे ते बोरिवली आणि बोरिवली ते ठाणे या जुळ्या बोगद्याच्या मुख्य कामांना तीन महिन्यांचा उशीर झाला आहे.

घोडबंदर रस्त्यावरील या जुळ्या बोगद्याच्या मुख्य कामांना विलंब झाला आहे तसेच केंद्रीय वन खात्याची मंजुरी आणि भूमिपूजनही झालेले नाही, असे एमएमआरडीएच्या एका अधिका-याने सांगितले. बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या अभयारण्याखालून हा बोगदा खणला जाणार आहे. हा मार्ग गांधी राष्ट्रीय अभयारण्याच्या भागातून जाणार असल्यामुळे वन विभागाची मंजुरी अत्यावश्यक आहे. मात्र त्यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारनेही गेल्यावर्षी पाच महिने केंद्र सरकारकडे विलंबाने पाठवला होता. त्यानंतर राज्य केंद्रीय वन्यजीव मंडळाचीही या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. शिवाय केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाची अंतिम पर्यावरणीय मंजुरी मिळाली आहे. हा प्रकल्प तब्बल पंधरा हजार कोटी रुपयांचा आहे.

पुढे पुढे येणा-या पावसामुळे या प्रकल्पालाही विलंब होण्याची शक्यता प्राधिकरणाच्या अधिका-यांकडून व्यक्त होत आहे. हा बोगदा ठाणे ते बोरिवली दरम्यान 5.74 किलोमीटर आणि बोरिवली ते ठाण्यादरम्यान 6. 09 किलोमीटर लांबीचा आहे. शिवाय दोन्हीकडील जोडरस्ता एक पॉईंट 55 किलोमीटर इतका आहे. या प्रकल्पाचा खर्च 6937 कोटी रुपये असून, ‘मेघा इंजिनिअरिंग‘ची बोली आहे आणि भूसंपादनाचा खर्च 700 कोटी रुपये आहे शिवाय, आकस्मिक खर्चही 375.40 कोटी रुपये आहे आणि अन्य सेवांसाठी तब्बल 261 कोटी रुपये खर्च होणार आहेत.