ठाणे : लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम लवकरच वाजणार असून, त्यासाठी जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदार संघ सज्ज झाले आहेत. या तिन्ही मतदारसंघांत 63 लाख 12 हजार 520 मतदार आहेत.
मतदानासाठी 6524 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून या केंद्रांवर देशसेवेला वाहून घेतलेल्या जिल्ह्यातील 1520 सैनिक मतदान करणार आहेत. यात 76 महिला सैनिकांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघातील रहिवासी असलेले सैनिक दलाच्या सेवेत कर्तव्य बजावत आहेत. जिल्ह्यातील ठाणे कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदार संघातील रहिवासी आहेत. देशाच्या संरक्षणासाठी असलेल्या कर्तव्यावरील सैनिकांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यांना पोस्टल बॅलेट पेपर उपलब्ध करून दिले जाणार असून त्यावर त्यांना आवडीच्या उमेदवाराला मतदान केल्यानंतर बॅलेट पेपर सिलबंद करून जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा निवडणूक शाखेच्याकडून देण्यात आली.