नवी मुंबई: कलिंगड म्हटलं की डोळ्यासमोर लाल गर असलेला फळ दिसतो, मात्र बाजारात आता पिवळा गर असलेला कलिंगड देखील दाखल होत आहे.
वाशीतील एपीएमसी बाजारात पिवळ्या कलिंगडाची आवक वाढली आहे. पिवळे कलिंगड आरोग्याला पोषक असल्याचे व्यापारी सांगतात. हे कलिंगड चवीला गोड आहेत. पिवळ्या कलिंगडाची आवक केवळ तीन महिनेच राहणार आहे. याला ग्राहकांची मोठी पसंती मिळू लागली आहे.
बाजारात सोलापूरमधून रोज दहा ते अकरा टन पिवळा कलिंगड दाखल होत आहे. दरम्यान एपीएमसी बाजारात लाल कलिंगडाचे दर १६ ते १७ रुपये किलो तर पिवळ्या कलिंगडाला बाजारात दुप्पट म्हणजे किलोमागे ३० ते ३५ रुपये दर मिळत आहे, अशी माहिती येथील व्यापाऱ्यांनी दिली.