१३७८५ एजन्सींची नोंदणी रद्द
ठाणे : ठाणे आणि मुंबईतील स्थावर संपदा एजंट्सना सन 2017 साली मिळालेल्या परवान्यांचे नूतनीकरण केलेले नाही, त्यामुळे महारेराने तब्बल 13,785 एजन्सींची ‘घाऊक’ नोंदणी रद्द केली आहे.
या सर्व एजंट्सना पुन्हा एजंट म्हणून काम करायचे असल्यास तरीही पुन्हा प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे. त्याशिवाय त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण होणार नाही असा सक्त इशारा ‘महारेरा’ ने सर्व संबंधित एजंटांना दिला आहे.
त्यात मुंबई आणि मुंबई उपनगराचे 6,291 असे सर्वात जास्त एजंट आहेत त्यानंतर खालोखाल ठाणे येथील 3075 आणि पुणे येथील 2349 येथील एजंटस्चा समावेश आहे. एकीकडे नूतनीकरणाअभावी अशी संख्या कमी होत असताना नवीन एजंटस्ही पात्र ठरले आहेत. एजंटांसाठी विहित केलेली चौथी परीक्षा नुकतीच घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
त्यात १७६७ उमेदवार परीक्षेला बसले होते. त्यापैकी 1527 उमेदवार प्राप्त झाले आहेत आणि 240 उमेदवारांची दांडी उडाली (नापास झाले) आहे. या परीक्षेचा निकाल 86.41% लागला असून मुंबईतील आरोही चिराग भिमाजीयानी या महिला शं•ार टक्के गुण मिळवून सर्वोत्तम ठरल्या आहेत. आतापर्यंत झालेल्या चार परीक्षांमध्ये शंभर टक्के गुण मिळवणा-या त्या पहिल्या उमेदवार ठरल्या आहेत. नोंदणी रद्द केलेल्या एजन्सी जिल्हा निहायसंख्या 13785 असून मुंबई उपनगरातील संख्या 4335 एजंट्स इतकी आहे.
नोंदणी रद्द केलेल्या मुंबई उपनगरातील एजन्सी संख्या 435 असून, त्याखालोखाल ठाणे क्रमांक दोनवर असून त्याचा आकडा 3075 इतका आहे. पुणे येथील 2349 असून त्यानंतर मुंबई शहरातील एजन्सी संख्या १९३८ आहे. त्यानंतर रायगडच्या एजन्सी संख्या 770 असून पालघरच्या एजन्सी संख्या 433 इतकी आहे. अन्य जिल्ह्यांतील एजन्सी बोटावर मोजण्याइतक्या आहेत.