नऊ लाखांची फसवणूक
ठाणे : अॅपद्वारे शेअर्स मार्केटमध्ये केलेल्या रक्कमेची वाढ होते, असे सांगून दोनजणांना आमिष दाखवल्यानंतर त्यांना अधिक नफा मिळवण्याचे पैसे आमिष दाखवले. त्याला भुलून त्यांनी 9 लाख 20 हजार रुपये गुंतवले. नंतर त्यांची आर्थिक फसवणूक झाल्यानंतर कल्याण येथील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
15 फेब्रुपारी 2024 रोजी ते 20 फेब्रुवारी 2024 रोजी 6 वाजताच्या दरम्यान फिर्यादी महिलेला (48) रा.रामबाग, कल्याण अनोळखी मोबाईलधारक महिला व व्यक्तीने व्हॉट्सअॅपमध्ये मेसेज केला आणि शेअर्स मार्केट क्लास जॉईन करण्यास सांगून ‘स्माईल’हे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले.
त्यानंतर फिर्यादी यांना या अॅपव्दारे शेअर्स मार्केटमध्ये पैसे गुंतवणुक केल्यास अधिक नफा मिळविण्याचे आमिष दाखवून एकूण नऊ लाख 20 हजार रुपये रक्कम ऑनलाईन पाठविण्यास सांगून त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे.
या प्रकाराबाबत फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात मोबाईलधारक आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री.नाईक हे करीत आहेत.