ठाणे : काँग्रेसचे पक्षाचे सर्वेसवा आणि खासदार राहुल गांधी यांचा ठाणे शहरात नियोजित आहे. त्यामुळे शुक्रवारी, १५ मार्च २४ पासून शहर आणि वाहतूक पोलिसांना, वरिष्ठ अधिकार-यांना शहरात सतर्क राहण्याचे आदेश नवी दिल्लीहून आल्यामुळे ठाणे पोलीस सतर्क झाले आहेत.
ठाण्यातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या आगमनाची व त्यांचे स्वागत करण्यासाठी उत्सुक झाले आहेत. खा. गांधी पहिल्यांदाच ठाण्यात आल्यामुळे वाहतूक पोलिसांनी त्यांची मार्गक्रमणा कशी असेल याचा अभ्यास केला आहे. दौ-यावेळी ठाणे शहरात वाहतूक कोंडी होऊच नये आणि परिसरातील वाहतूक सुरळीत आणि सुनिश्चित राहणे आम जनतेच्या सोयीसाठी आवश्यक आहे. त्यामुळे ठाणे शहरातील वाहतूक पोलीस विभागाचे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी वरिष्ठ वाहतूक पोलिसांशी चर्चा करुन आणि प्रत्यक्ष पाहणी करुन वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली.
अधिसूचनेनुसार त्यांना प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन ठाणे शहरातील वाहतूक नियंत्रण अधिसूचना १५ मार्च रोजी प्रसिद्ध केली. ही वाहतूक अधिसूचना १६ मार्च २४ रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. कोपरी, ठाणे नगर, कळवा, राबोडी, नौपाडा या उपविभागांतील वाहनांना प्रवेश बंद होता कामा नये आणि त्यामुळे ठाणेकरांच्या दैनंदिन कार्यक्रमांमध्ये व्यत्यय येता कामा नये असे पर्यायी मार्ग कोणकोणते आहेत, याची सखोल पाहणी केली. ही अधिसूचना पोलीस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही, अशी माहिती डॉ. राठोड यांनी दिली.