ब्राह्मण व्यापारी सेवा संस्थेचे व्यावसायिक संमेलन उत्साहात

ठाणे: ब्राह्मण व्यापारी सेवा संस्थेचे (बीव्हीएसएस) त्रैवार्षिक व्यावसायिक संमेलन रविवार १० मार्च रोजी शहनाई हॉल, ठाणे येथे यशस्वीपणे पार पडले.
सुमारे वेगवेगळ्या क्षेत्रातील 150 व्यावसायिकांचा संमेलनात सहभाग होता. ठाणे, नवी मुंबई, मुंबई, डोंबिवली येथून मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या व्यवसायातील ब्राह्मण उद्योजक जमले होते. व्यवसायिकांची एकमेकांबरोबर ओळख, एकमेकांच्या व्यवसायास लागणारी माहिती याचे आदान-प्रदान झाले. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन प्रमुख पाहुणे पितांबरी उद्योग समूहाचे चेअरमन रविंद्र प्रभुदेसाई तसेच संग्राम इंटरप्राईजेस व ठाणे केमिस्ट आणि ड्रगिस्ट सोसायटीचे चेअरमन विलास जोशी यांचे हस्ते झाले. तान स्वा कंपनीचे चेअरमन संजय खरे आणि संचालक स्वाती खरे आणि आशिदा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे चीफ एक्झिक्युटीव ऑफिसर श्रीकृष्ण नाईक व त्यांच्या पत्नी हे सर्व मान्यवर उपस्थित होते.
बीव्हीएसएसच्या व्यावसायिक उद्योजक पुरवणीचे प्रकाशन श्रीकृष्ण नाईक यांच्या हस्ते करण्यात आले . प्रमुख पाहुण्यांचे उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. बीव्हीएसएस संस्थेचे मान्यवरांकडून कौतुक करण्यात आले व त्यांनी संस्थेला शुभेच्छा दिल्या.