रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

ठाणे : मध्य रेल्वेचा मुंबई विभाग येत्या रविवारी, १० मार्च २४ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक परिचालीत करणार आहे. हा मेगाब्लॉक विद्याविहार आणि ठाणे दरम्यान पाचवी व सहावी लाईनवर सकाळी ८ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत होणार आहे.

ब्लॉक कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथून सुटणा-या आणि येणा-या डाऊन आणि अप मेल/एक्सप्रेस गाड्या विद्याविहार आणि ठाणे स्थानकाच्या दरम्यान अनुक्रमे डाऊन आणि अप जलद मार्गांवर वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिराने चालवण्यात जातील.
मानखुर्द ते नेरुळ अप -डाऊन हार्बरवर सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ पर्यंत आणि छशिमट मुंबई येथून सकाळी १०.१८ ते दुपारी ३.२८ पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी येथे जाणा-या डाऊन हार्बर सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.३७ ते दुपारी ३.४५ या वेळेत छशिमट येथे जाणा-या अप हार्बर सेवा रद्द राहतील.