“शिष्यवृत्ती” १५ मार्चपासून प्रदर्शित !
आई-वडील जरी आपल्या मुलांवर संस्कार घडवत असले तरी, मुलांच्या एकंदरीत जडण-घडणीत, विचारांत सर्वाधिक मोठा वाटा असतो तो शिक्षकाचा. कारण मुलं जेवढा वेळ घरात नसतात त्याहुन अधिक काळ त्यांचा शाळेत आपल्या शिक्षकांच्या सहवासात जातो, त्यामुळे आपले आचार- विचार हे शिक्षकांवर अवलंबून आहेत, अशीच शिक्षक आणि विद्यार्थी यांची भावस्पर्शी गोष्ट लेखक दिग्दर्शक अखिल देसाई यांनी देखील आपल्या साज इंटरनेटमेंट बॅनर अंतर्गत “शिष्यवृत्ती” सिनेमातून शिष्यवृत्ती विषयाला एका वेगळ्या पद्धतीने मांडली आहे, आज या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. चित्रपटाचे सहनिर्माते सुरेश ढोरे, अनिल आणि सुनील बच्छाव आहेत.
पोस्टर मध्ये आपण शाळा,पटांगण आणि विद्यार्थी बघतो, यावरून लक्षात येते की शिष्यवृत्ती चित्रपटाची पार्श्वभूमी ही शाळा आणि शिक्षक-विद्यार्थी यांची आहे. चित्रपटात थ्री इडियट चित्रपटाचा सेंटीमीटर फेम दुष्यंत वाघ, निकिता पाटील, रुद्र ढोरे, कमलेश सावंत, अनिकेत केळकर, अंशुमन विचारे,उदय सबनीस यांच्या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. शिक्षक विद्यार्थी सोबत आजच्या शिक्षण पध्दती आणि त्यांच्या अंमलबजवणीवर देखील दिग्दर्शक अखिल देसाई यांनी भाष्य केलं आहे. चित्रपटात एकूण ४ गाणी असून, चित्रपटाला भरत सिंग यांचे संगीत लाभले आहे.
सिनेमा हा समाजाचे प्रतिबिंब असल्याने आपल्या आसपास घडत असलेल्या घटना सिनेमात, सिनेमाचे स्वातंत्र्य घेत दर्शवणे ही एक मोठी तारेवरची कसरत अखिल देसाई यांच्यासाठी होती. परंतु गुणी कलाकारांच्या सहाय्याने त्यांनी हा किल्ला सर केला असून, येत्या १५ मार्च रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.