झी एंटरटेनमेंटने केली पी.डब्ल्यू.डी ठाणेवर १ धावानी मात

48 व्या ठाणेवैभव आंतर ऑफिस क्रिकेट स्पर्धेत सेंट्रल मैदानावर बुधवारी झी एंटरटेनमेंटने पी.डब्ल्यू.डी ठाण्यावर एका धावेने मात करून एक रोमांचक सामना जिंकला.

प्रथम फलंदाजी करताना झी एंटरटेनमेंटचा संघ 30 षटकांत 163 धावांवर आटोपला. प्रथमेश कडूने 57 चेंडूंत चार चौकारांसह सर्वाधिक 43 धावा केल्या. कडू व्यतिरिक्त, यष्टिरक्षक-फलंदाज रुपेश मांजरेकर (29 चेंडूत 24 धावा) आणि शित रांभिया (25 चेंडूत 29 धावा) यांनीही फलंदाजीत मोठे योगदान दिले. दुसरीकडे, एन.एम पवार पी.डब्ल्यू.डी ठाण्यासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला कारण त्याने तीन विकेट्स घेतल्या.

नानासाहेब पवार, पी.डब्ल्यू. डी., ठाणे

प्रत्युत्तरादाखल पी.डब्ल्यू.डी ठाण्याने धावसंख्येचा चांगला पाठलाग केला, मात्र शेवटी ते केवळ एका धावेनेच हुकले. गौरव देशमुखने 37 चेंडूंत चार चौकारांसह नाबाद 31 धावा केल्या आणि तो त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. प्रवीण शिरसाठ (47 चेंडूत 29 धावा) आणि उमेश राठोड (25 चेंडूत 22 धावा) या सलामीच्या जोडीने दमदार सुरुवात करून दिली, पण संघाला विजय मिळवून देऊ शकले नाही. झी एंटरटेनमेंटच्या रांभियाने तीन विकेट्स पटकावून चेंडुनेसुद्धा प्रभावित केले. 

शित राम्भीया, झी एंटरटेनमेंट

संक्षिप्त धावफलक: झी एंटरटेनमेंट 30 षटकांत 163 सर्वबाद (प्रथमेश कडू 43; एन.एम पवार 3/41) विजयी वि. पी.डब्ल्यू.डी ठाणे 31 षटकांत 162/9 (गौरव देशमुख 31*; शित रांभिया 3/31)