झी मराठीवर पारू आणि शिवा नंतर ‘नवरी मिळाले हिटलरला’ मधल्या अभिराम जहागीरदारने म्हणजेच राकेश बापट याने प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवले असतानाच, आता हिंदी मालिका आणि मराठी चित्रपटातला हँडसम चेहेरा ‘अक्षय म्हात्रे’ लवकरच ‘पुन्हा कर्तव्य आहे’ ह्या नवीन मालिकेतून झी मराठीवर पदार्पण करणार आहे. ह्या मालिकेच्या निमित्ताने अक्षय म्हात्रे पुन्हा एकदा एका मराठी डेलीसोप मध्ये दिसणार आहे आणि अक्षयची साथ देणार आहे ‘अक्षया हिंदाळकर’.
प्रेक्षकांनी एका सुंदर आणि इमोशनल गाण्याद्वारे ह्या मालिकेची झलक पाहिली असेलच. या मालिकेचं लेखन केलंय सुखदा अहिरे हिने तर मालिकेचे दिग्दर्शक आहेत शैलेश डेरे. तर टेल अ टेल मीडिया या मालिकेची निर्मिती करणार आहेत. ‘पुन्हा कर्तव्य आहे’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.