नवी मुंबई : वैभव, शौर्य, दया आणि औदार्य यांचे प्रतिक असलेले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज कोंकण भवनात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
यावेळी महसूल आणि इतर विभागाचे अधिकरी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण देशात मुघलांनी राज्य व्यापले असताना शिवरायांचा जन्म झाला आणि त्यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार केला. महात्मा जोतिबा फुले यांनी 1869 साली महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड येथील समाधी शोधून काढत महाराजांच्या जीवनावर सर्व प्रथम प्रदीर्घ पोवाडा लिहिला. सर्वात आधी महात्मा जोतिबा फुले यांनी शिवाजी महाराज यांची जयंती सुरु करण्यास सुरुवात केली. त्यानंतर 1895 मध्ये लोकमान्य टिळकांनी शिवजयंतीला उत्सवाचे स्वरूप दिले.