ट्रॅम्पोलिन आणि टंबलिंग जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत भोईर जिमखान्याचे सुयश

डोंबिवली : येथील भोईर जिमखान्याचे विद्यार्थी १६ ते १८ फेब्रुवारी २०२४ दरम्यान कोझिकोड, केरळ येथे ट्रॅम्पोलिन आणि टंबलिंग जिम्नॅस्टिक्स नॅशनल चॅम्पियनशिप २०२४ मध्ये सहभागी झाले होते. डोंबिवलीतील भोईर जिमखान्याच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत पारितोषिक पटकवले आहे. या स्पर्धेत एकूण १० सुवर्णपदके, ३ रौप्य आणि १ कांस्य अशी एकूण एकूण १४ पदके त्यांनी मिळवली.

चैत्राली सोनवणे सब ज्युनियर वैयक्तिक रौप्य आणि सांघिक सुवर्ण, देविका सहारे सब ज्युनियर वैयक्तिक कांस्य आणि सांघिक सुवर्ण, आर्य दळवी सब ज्युनियर वैयक्तिक रौप्य आणि सांघिक सुवर्ण, अनुराग चव्हाण ज्युनियर सांघिक सुवर्ण, आस्था डॅश सब ज्युनियर वैयक्तिक सुवर्ण आणि सांघिक सुवर्ण, राही पाखले वरिष्ठ वैयक्तिक सुवर्ण आणि सांघिक सुवर्ण, सेजल जाधव वरिष्ठ संघ सुवर्ण, सिद्धी जातीचे वरिष्ठ संघ सुवर्ण, आदर्श भोईर वरिष्ठ वैयक्तिक रौप्य आणि सांघिक सुवर्ण व नॅन्सी बरौलिया वरिष्ठ संघ सुवर्ण अशी पदक प्राप्त खेळाडूंची नावे आहेत.