‘प्रतिशोध’- झुंज अस्तित्वाची! मालिकेत रमेश वाणी साकारणार तृतीयपंथी व्यक्तिरेखा!

सोनी मराठी वाहिनी आशयघन विषय मांडत वेगवेगळ्या मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. आता ‘प्रतिशोध’ झुंज अस्तित्वाची ही मालिका सध्या रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे.

‘प्रतिशोध’ ही मालिका आई आणि मुलगी यांच्या विशिष्ट नात्यावर भाष्य करणारी थरारक मालिका आहे. तृतीयपंथी आई आणि दिशा नावाची मुलगी यांचं नातं आणि त्यांचा संघर्ष यांची कहाणी या मालिकेतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ममता एम.डी. झालेली आहे आणि दिशा तिची मुलगी आहे हे सिद्ध करण्यासाठी तिला झटावे लागते आहे. सत्यजित  राहण्यासाठी तिला हे साध्य करणे फार महत्त्वाचे आहे. पण मालिकेत आता एन्ट्री होणार आहे रमेश वाणी यांची. गुरू मा असे या व्यक्तिरेखेचे  नाव आहे. ते चक्क तृतीयपंथी व्यक्तिरेखा साकारताना प्रेक्षकांना दिसतील. विविध चित्रपट, मालिका यांत गाजलेल्या भूमिका त्यांनी केल्या आहेत.

‘प्रतिशोध’- झुंज अस्तित्वाची! या मालिकेतील त्यांच्या या आगळ्यावेगळ्या भूमिकेमुळे मालिका काय वळण घेईल, हे आता पाहायला मिळेल. रमेश वाणी यांची गुरू मा ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेईल. गुरू मा या व्यक्तिरेखेची चर्चा सर्वत्र रंगणार आहे. तृतीयपंथी व्यक्तिरेखा असल्यामुळे त्यांचे हावभाव पाहण्यासारखे असतील. गुरू मा ही तृतीयपंथ्यांची प्रमुख आहे आणि ममता हीच दिशाची आई आहे, हे सत्य तिला माहीत आहे. पण ती सत्य सांगून ममताला मदत करेल का की सत्यजीतची बाजू घेऊन ममताच्या अडचणींमध्ये भर घालेल, हे आता मालिकेत पाहायला मिळेल.

निरनिराळ्या चित्रपटांमधून आणि मालिकांमधून वेगवेगळ्या भूमिकांद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणारे रमेश वाणी हे गुरू मा या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. भूतकाळाची सावली बदलणार भविष्याची दिशा!

पाहायला विसरू नका ‘प्रतिशोध’- झुंज अस्तित्वाची. सोम. ते शुक्र. रा. १० वा. सोनी मराठी वाहिनीवर.