वेळेत प्रवेश प्रक्रिया न करणा-या महाविद्यालयांना दंड

मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशाच्या अंतिम तारखा जाहीर

ठाणे : काही महाविद्यालये वेळेत प्रवेश प्रक्रिया करीत नाहीत. तसेच विद्यापीठाला विहित मुदतीत विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज सादर करीत नसल्याने या विद्यार्थ्यांची विद्यापीठात नोंदणी होत नाही किंवा नोंदणी करतात. पुढील अडचणी उद्भवू नयेत म्हणून विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून सर्व विद्याशाखेच्या प्रवेशाच्या अंतिम तारखा जाहीर केल्या आहेत.

महाविद्यालयाने विहित मुदतीत जर प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास त्यांना दंड लावण्यात येणार आहे, असे परिपत्रक विद्यापीठाने प्रसिद्ध केले आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ पासून प्रवेश देण्याची व संबधित एमकेसीएल / ई-समर्थ या प्रणालीमध्ये नोंदवण्याची शेवटची तारीख दिली आहे. त्या तारखेनंतर प्रवेश देता येणार नाहीत.
पदवी अभ्यासक्रम ( कला, वाणिज्य, विज्ञान शाखानिहाय नियमित व व्यावसायिक अभ्यासक्रम), प्रथम वर्ष १२ वी निकालानंतर ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत, द्वितीय वर्ष ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत आणि तृतीय वर्ष ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रम ( एमए, एमकॉम, एमएसस्सी ) याचे प्रथम वर्ष सत्र १ व २ चे वेळापत्रक ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत असून, द्वितीय वर्ष सत्र ३ व ४ करिता ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत आहे. व्यावसायिक अभ्यासक्रम, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, विधी, शिक्षणशास्त्र व व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमाला अंतिम तारखेनंतर दंड आकारण्यात येणार आहे.

महाविद्यालयांनी प्रत्येक दिवसाची प्रवेश प्रक्रिया त्याच दिवशी पूर्ण करून एमकेसीएल / ई-समर्थ या प्रणालीमध्ये नोंदवावी व तारखेनंतर प्रवेश करता येणार नाही. संबधित प्रणालीमध्ये शेवटच्या तारखेपर्यंत नोंदणी केल्यास दंड अंतिम तारखेनंतर ३० दिवसापर्यंत दंड पाच हजार रुपये, ३० दिवसानंतर पाच हजार रुपये प्रती विद्यार्थी, प्रतीदिन १० रुपये दंड आकारण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.

यासाठी सर्व प्रवेश प्रक्रिया त्याच शैक्षणिक वर्षात करणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत पुढील शैक्षणिक वर्षात केल्या जाणार नाहीत. ‘प्रलंबित प्रकरणे’ जर महाविद्यालयांकडून शैक्षणिक वर्ष २०२०-२१ व २०२१-२२ मधील काही प्रलंबित प्रकरणे असल्यास त्या-त्या महाविद्यालयांनी व्यवस्थापन परिषदेच्या ठरावानुसार दंड भरून १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत विद्यापीठात आणून जमा करावा, असे निर्देश विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी दिले आहेत. विद्यापीठाने पुर्नविलोकन समितीही स्थापन केली.