नवी मुंबई -: मागील काही दिवसांपासून राज्यात हत्या सत्र सुरू असल्याने कायदा सुवेवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे कोणतेही राजकीय दबाव न आणता फक्त ४८ पोलिसांना सूट द्या, महाराष्ट्र सरळ करण्याची ताकत त्यांच्यात आहे. असे वक्तव्य शर्मिला ठाकरे यांनी केले.नवी मुंबई शहर मनसेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या.
राज्यात बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत बोलताना राज साहेबांनी मागेच सांगितले आहे ४८ तासात महाराष्ट्र सरळ करण्याची ताकद महाराष्ट्र पोलिसांमध्ये आहे.त्यांच्यावर कोणताही राजकीय दबाव न टाकता पोलिसांच्या हातात राज्य दिल्यास राज्य सरळ होईल.महाराष्ट्र राज्य युपी, बिहार झालेला आहे आणि
पुढे ते होऊ नये त्यामुळे सरकारने याबाबत दखल घ्यावी अशा प्रकारचे वक्तव्य शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केले.मनसेच्या वतीने शहरात ब्रास बँड लोककला स्पर्धा, नाका तिथे शाखा, हळदी कुंकू, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमांचे उद्घाटन शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी त्यांच्या सोबत मनसे नेत्या रिटा गुप्ता देखील हजर होत्या.