आशा सेविका आणि गट प्रवर्तकांचा पायी मोर्चा

महाराष्ट्र आरोग्य खाते आशा आणि गटप्रवर्तक संघटना आयटक यांच्या संयुक्त विद्यमाने विविध मागण्यांसाठी आशा सेविका आणि गट प्रवर्तकांचा पायी मोर्चा शहापूरपासून सुरू झाला होता. शुक्रवारी एक हजारहून अधिक आशा सेविकांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चौकात आंदोलन केले.