सराईत सोनसाखळी चोर जेरबंद

ठाणे : येथील वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरणा-या सराईत आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरलेला माल हस्तगत केलाच शिवाय चितळसर आणि कापुरबावडी पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हे उघडकीस आणून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

सोनसाखळी खेचून दुचाकींवरून पलायन करणारे आरोपी हे इराणी असल्याने ते मुद्देमालाची विल्हेवाट लावत असल्यामुळे ते पोलिसांच्या हाती लागत नव्हते. अखेरीस पोलिसांनी त्यांचा ठावठिकाणा शिताफीने शोधून त्यांना अटक केली व सोन्याचे दागिने आणि चार लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

एका घटनेत 13 नोव्हेंबर 23 रोजी रात्री 10:20 च्या सुमारास फिर्यादी हे जेवणानंतर वॉकिंग करताना चिल्ड्रन हॉस्पिटल लगतच्या पदपथावर मोटरसायकलवर बसलेल्या एकाने फिर्यादीच्या गळ्यातील ४० हजार रुपये किंमतीची 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन खेचली होती. त्याबाबत फिर्यादींनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. चितळसर आणि कापूरबावडी पोलीस स्टेशन हद्दीतदेखील सोन्याची चेन खेचल्याची घटना झाली होती.

या अनुषंगाने वर्तकनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी झालेल्या प्रत्येक घटनास्थळी भेट देऊन दिली. दोन्ही घटनांमध्ये अंदाजे ३०० सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण केले व त्या अनुषंगाने गुन्ह्यातील आरोपी यांचा आंबिवली कल्याणपर्यंत माग घेण्यात आला. त्या ठिकाणी आरोपीबाबत गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली असता आरोपी सय्यद मिसम आबास उर्फ हरी सय्यद हुसेनी (वय 21.रा. आंबिवली इराणी मशिदजवळ राहतो हे निष्पन्न झाले आहे.

आरोपीकडून जबरी चेनचोरीचे सहा गुन्हे व मोटार सायकल चोरीचा एक गुन्हा उघडकीस आणला व त्याच्याकडून 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व एक मोटरसायकल असा एकूण दोन लाख 40 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याप्रकरणी वर्तकनगर पोलीस स्टेशनचे दोन, चितळसर पोलीस स्टेशनचे दोन व प्रत्येकी एक कापूरबावडी, विठ्ठलवाडी आणि खडकपाडा पोलीसचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीने चोरी केलेल्या काही मुद्देमालाची विल्हेवाट लावली असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्याबाबत पुढील तपास सुरु आहे. यातही कोठडी दरम्यान तपास करुन चेनचोरीचे दोन गुन्हे मोटारसायकल असा एकू ण दोन लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.