अयोध्येत श्री राम दर्शनासाठी भाजपाची ठाण्यातून विशेष ट्रेन

ठाणे: भाजपा प्रदेश कार्यालयाच्यावतीने, अयोध्येतील प्रभू श्री रामाचे दर्शन घेण्यासाठी ७ फेब्रुवारी रोजी विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे.

यापूर्वी ३१ जानेवारी रोजीचा अयोध्या दौरा कमी तापमानामुळे तात्पुरता स्थगित करण्यात आला होता. आता ७ फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० वाजता ठाण्यातून अयोध्या धामकडे ट्रेन रवाना होणार असून, ती ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजून ५० मिनिटांनी पोचेल. परतीचा प्रवास १० फेब्रुवारी या दिवशी अयोध्या धामवरून ट्रेन सुटेल व १२ फेब्रुवारी रोजी ठाण्यात पोहोचणार आहे. अयोध्या ठिकाणी राहण्याची व खाण्या-पिण्याची सोय केली जाईल. या ट्रेनने अयोध्येला जाण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींनी आपली नावे, आधारकार्डची झेरॉक्स आणि मोबाईल क्रमांक आमदार संजय केळकर यांच्या संपर्क कार्यालयात जमा करावे, अथवा 022 25333850 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा ठाणे विधानसभा निवडणूक प्रमुख ॲड. सुभाष काळे यांच्याशी 9821121093 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.