ठाणे : अयोध्या नगरीत श्री राम मंदिर उभे राहण्यासाठी झालेल्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणारे माजी खासदार सतीश प्रधान यांचा सत्कार शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून करण्यात आला. खासदार राजन विचारे यांनी सोमवारी पदाधिकाऱ्यांसह श्री.प्रधान यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी जिल्हाप्रमुख केदार दिघे, उपजिल्हाप्रमुख कृष्णकुमार कोळी, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, उपशहर प्रमुख संतोष शिर्के, माजी नगरसेवक संजय दळवी, स्वप्नील शिरकर, प्रदीप शेडगे, शाखाप्रमुख अमोल हिंगे, प्रदीप वाघ, सुभाष म्हसकर, प्रमिला भांगे, मंजिरी ढमाले आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.