नोटीस न देता २२ दुकानांवर कारवाई

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या रोड नं १६ येथे असलेल्या दुकानांना कोणतीही नोटीस न देता पालिका अधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला असून नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

ठाणे महापालिकेने गेल्या ४४ वर्षांपासून मालमत्ता कराची आकारणी केलेल्या वागळे इस्टेट, मार्ग क्र.१६ येथील व्यवसायिक गाळ्यांवर कारवाई करून जमीनदोस्त केले. लेखी नोटीस न देता गाळे तोडून मनमानी केली असून आर्थिक नुकसान झालेच शिवाय रोजगारही बुडाला, असे गाळेधारक रईस चौधरी यांनी सांगितले. या जागेवर मालकी हक्क ठामपाचा की एमआयडीसीचा हे सुध्दा गाळेधारकांना समजले पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे.