ठाणे : आगरी-कोळी समाजाचे व ओवळा गावचे समाजसेवक, ठाणे शिवसेना विभाग समन्वयक राजेंद्र पाटील यांची कन्या वैष्णवी पाटील हिने लंडन शहरातील ग्रीनीच विद्यापीठात “मिडिया मार्केटींग व ऍडव्हर्टायझिंग” या विषयात “मास्टर्स” हा किताब प्रथम श्रेणी मिळवून पटकावला.
वैष्णवीच्या या कामगिरीने सर्व ग्रामस्थ व समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे. सर्व स्तरांतून वैष्णवी व कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आपल्या समाजातील मुलामुलींना शिक्षणाची सर्व दारे आपल्या पाल्यांनी अशीच खुली करून द्यावी, जेणेकरून ही मुले आपल्या कर्तृत्वाने देश-विदेशात आपला समाज व संस्कृतीचा ठसा उमटवतील व सन्मान करतील असे राजेंद्र पाटील यांनी सांगितले.