ठाणे: रोट्रॅक्ट क्लब ऑफ ठाणे सबर्बन या संघाच्या युवा पिढीने एक आगळावेगळा आधुनिक प्रकल्प ‘माझे ग्रंथालय’ या नावाने सुरू केला आहे.
२०२२ मध्ये या प्रकल्पाचा श्री गणेशा करण्यात आला. यावर्षी १००० पेक्षा अधिक पुस्तकांचे दालन या संघाने उभारले आहे. ज्यात दोन पुस्तक दालनासह बालगीते, कथा-कादंबरी, सामान्य ज्ञान, धार्मिक पुस्तके अशा अनेक पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हा परिषद शाळा विश्वभारती, भिवंडी व कृष्णराव वृद्धाश्रम, बदलापूर आणि श्री साई धाम वृद्धाश्रम डोंबिवली या प्रकल्पाचे लाभार्थी ठरले. “ज्ञानदान हेच श्रेष्ठ दान” अशी धोरणा आत्मसात करून चिमुकल्यांपासून ते वृद्धांपर्यंत ही ज्ञानगंगा पोचवण्यासाठी रोटरी व रोट्रॅक्ट क्लब ऑफ ठाणे सबर्बन उत्साहाने प्रयत्न करत आहेत.