पालिकेने बजावल्या दोन हजार दुकानदारांना नोटीस
ठाणे : मराठी पाट्यांच्या मुद्यावरुन आता ठाणे महापालिकेने सुध्दा मागील काही दिवसांपासून मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार आतापर्यंत १९५८ दुकानदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
मराठी पाट्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम २०१७ मधील कलम ३६ क नुसार दुकाने व आस्थापना यांचे नामफलक मराठीत असणे बंधनकारक आहे. त्यानुसार ठाणे महापालिका हद्दीतील नऊ प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांवर नामफलक मराठीत आहेत का? याबाबतची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत दुकाने आणि आस्थापना यांची तपासणी करण्यात येत आहे.
त्यानुसार नऊ प्रभाग समिती अंतर्गत सहायक आयुक्तांच्या मार्फत त्या-त्या ठिकाणच्या आस्थापना तपासल्या जात असून ज्या आस्थापनांवर मराठी भाषेत नामफलक नसेल अशांना नोटीसा बजावल्या जात आहेत.महापालिकेने काल प्रयन्त १८७१ दुकानदारांना नोटीसा पाठवल्या होत्या. आज एका दिवसात ८७जणांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. सर्वाधिक नोटीस मुंब्रा प्रभाग समितीच्या हद्दीमध्ये देण्यात आल्या आहेत.
कोपरी-नौपाडा प्रभाग समिती हद्दीत 00, माजिवडा-मानपाडा प्रभागात ११ लोकमान्य नगर-सावरकर नगर प्रभागात १२, उथळसर प्रभागात २८ वर्तकनगर प्रभागात ००, मुंब्रा-३६, दिवा-००, वागळे-०० आणि कळवा प्रभाग हद्दीत ०० जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.