ठाणे : ‘महावितरण’कडून वीज बिलांची थकबाकी असलेल्या ग्राहकांवर कारवाई करण्यात येत असताना कर्मचा-यांनी दोन भावांवर शासकीय कामकाजात अडथळा आणल्याच्या घटनेप्रकरणी नवघर मुलुंड पोलिसांनी अटक केली आहे. त्याद्वयींना पोलीस कोठडीत ठेवले आहे.
सचिन बोराडे आणि योगेश बोराडे अशी अटक आरोपींची नावे आहेत.
२१ नोव्हेंबर २०२३ रोजी ११ वाजताच्या सुमारास महिला वरिष्ठ तंत्रज्ञ आपल्या विभागातील सहायक अभियंता रहमुद्दीन शेख यांच्या आदेशानुसार महिला वरिष्ठ तंत्रज्ञ आणि सोबत असलेल्या अप्रेंटिस महिला तसेच वरिष्ठ तंत्रज्ञ विकास उमटोल आणि शांतवन लोखंडे यांनी वीज बिल थकविणा-या ग्राहकांना संपर्क केला आणि त्यांचा वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर, तिसरे ग्राहक अंकुश बोराडे यांचेही ८४ दिवसांपासून वीज देयक थकीत असल्याने त्यांच्या घरी गेले. तेथे सचिन बोराडे यांना बिल भरण्याबाबत सूचना केली. दुपारी पुन्हा ‘महावितरण’चे कर्मचारी अंकुश बोराडे यांच्याकडे आले आणि सचिन बोराडे यांना वीज देयक भरा अन्यथा वीज जोडणी तोडावी लागेल असे स्पष्ट केले. ‘माझ्या वीज मिटरला हात लावून दाखव मी तुला जीवे ठार मारेन. वीज मीटर कनेक्शन खंडित करताना सचिन बोराडे हा महिला तंत्रज्ञाच्या अंगावर धावून आला. माझ्या वीज मीटरला तू हात कशी लावतेस तसेच अत्यंत अर्वाच्य व अश्लील भाषेत शिवीगाळ केली.
शासकीय कामकाजात अडथळा केल्याने महिला तंत्रज्ञांनी सहायक अभियंता शेख यांच्या मदतीने पोलीस ठाण्यात तक्रार केली. या प्रकरणी सचिन बोराडे आणि योगेश बोराडे यांना पोलिसांनी अटक केली.