ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश एका ‘डेड रबर’ मध्ये आमनेसामने

Photo credits: AP/ICC

पाचवेळा विश्वचषक विजेता ऑस्ट्रेलिया याने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. हे अगदी अपेक्षित होते परंतु भारत आणि दक्षिण आफ्रिकेकडून पहिल्या दोन सामन्यात पराभूत झाल्या नंतर ऑस्ट्रेलिया संघाच्या आणि वैयक्तिक खेळाडूंभोवती अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. तेव्हापासून त्यांनी जोरदार संघर्ष केला आणि दमदार ‘कमबॅक’ केला. त्यांच्या मागील सामन्यामध्ये ग्लेन मॅक्सवेलने अविश्वसनीय द्विशतक ठोकून आपल्या संघाला अफगाणिस्तानविरुद्ध पराभवाच्या जबड्यातून विजय काढून घेण्यास मदत केली.

उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार असल्याने त्यांच्याकडे साखळी सामन्यात मिळालेल्या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे. पुढे, अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाची भारताशी गाठ पडल्यास (जर दोघांनी आपापल्या उपांत्य फेरीत विजय मिळवला तर) त्यांना भारताशी देखील झालेल्या पराभवाचा बदला घेता येईल.

मात्र, त्याआधी ११ नोव्हेंबरला पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाशी बांगलादेशचा सामना होणार आहे.

 

ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने

ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांनी १९९० ते २०१९ दरम्यान एकमेकांविरुद्ध २१ एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी ऑस्ट्रेलियाने १९ जिंकले आहेत, बांगलादेशने एक जिंकला आहे आणि एका सामन्याचा निकाल लागला नाही. भारतात त्यांनी कधीही एकदिवसीय सामना खेळला नाही. विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने बांगलादेशविरुद्ध ३-० अशी आघाडी घेतली आहे.

  ऑस्ट्रेलिया बांगलादेश
आयसीसी रँकिंग (एक दिवसीय क्रिकेट)
एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने १९
विश्वचषकात

 

आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मधील ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशची आतापर्यंतची कामगिरी

ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये आपला नववा आणि शेवटचा साखळी सामना खेळतील. आठ सामन्यांपैकी ऑस्ट्रेलियाने सहा, तर बांगलादेशने दोन जिंकले आहेत. ऑस्ट्रेलिया आधीच उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे, तर बांगलादेश स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तथापि, गमावण्यासारखे काहीही नसताना, बांगलादेश निर्भय क्रिकेट खेळून त्यांच्या विश्वचषकाची मोहीम अभिमानाने संपवायचा प्रयत्न करेल.

 

सामना क्रमांक ऑस्ट्रेलिया बांगलादेश
भारताकडून ६ विकेटने पराभव अफगाणिस्तानचा ६ गडी राखून पराभव
दक्षिण आफ्रिकेकडून १३४ धावांनी पराभव इंग्लंडकडून १३७ धावांनी पराभव
श्रीलंकेचा ५ विकेटने पराभव न्यूझीलंडकडून ८ विकेटने पराभव
पाकिस्तानचा ६२ धावांनी पराभव भारताकडून ७ विकेटने पराभव
नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव दक्षिण आफ्रिकेकडून १४९ धावांनी पराभव
न्यूझीलंडचा ५ धावांनी पराभव नेदरलँड्सकडून ८७ धावांनी पराभव
इंग्लंडचा ३३ धावांनी पराभव पाकिस्तानकडून ७ विकेटने पराभव
अफगाणिस्तानचा ३ विकेटने पराभव श्रीलंकेचा ३ विकेटने पराभव

 

संघ

ऑस्ट्रेलिया: पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, शॉन अॅबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लाबूशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.

बांगलादेशः नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), लिटन दास, तन्झिद हसन तमीम, तौहिद हृदोय, मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह रियाद, मेहिदी हसन मिराझ, नसुम अहमद, शाक मेहेदी हसन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, शोरीफुल इस्लाम, तनझिम हसन साकिब, अनामूल हक.

 

दुखापती अपडेट्स

बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसन ६ नोव्हेंबर रोजी बांगलादेशच्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याच्या डाव्या हाताच्या तर्जनीला फ्रॅक्चर झाल्यामुळे संघाबाहेर झाला. त्याच्या जागी अनामूल हकची निवड करण्यात आली आहे. याशिवाय, ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथला अफगाणिस्तान सामन्याच्या आधी झालेल्या सर्व सत्रात चक्कर आल्याने तो अफगाणिस्तानविरुद्ध खेळू शकला नाही. बांगलादेशविरुद्ध स्मिथ मैदानात उतरेल अशी अपेक्षा केली जाते.

 

खेळण्याची परिस्थिती

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील सामना होणार आहे. या स्पर्धेतील पाचवा आणि शेवटचा सामना हे ठिकाण आयोजित करेल. प्रथम फलंदाजी करणार्‍या संघांनी पहिले दोन सामने जिंकले आहेत आणि दुसर्‍या डावात फलंदाजी करणार्‍या संघांनी शेवटचे दोन सामने जिंकले आहेत. येथे सर्वाधिक धावसंख्या ३५७ आहे आणि सर्वात कमी १६७ आहे. येथील परिस्थिती फलंदाजीसाठी अनुकूल आहे.

  

हवामान

हवामानात थोडे ढग आणि सूर्यप्रकाश दिसण्याची अपेक्षा आहे. दिवसभरात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. ७७% ढगांचे आच्छादन आणि २५% पावसाची शक्यता असेल. पूर्व-आग्नेयेकडून वारे वाहतील.

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

ग्लेन मॅक्सवेल: ऑस्ट्रेलियाच्या या भारदस्त अष्टपैलूने अफगाणिस्तानविरुद्ध २०१* धावा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याशिवाय, त्याचा ऑफ स्पिन उपयुक्त गोलंदाजीचा पर्याय म्हणून सिद्ध झाला आहे.

अॅडम झम्पा: ऑस्ट्रेलियाचा चतुर लेगस्पिनर आठ सामन्यांत तीन फोरफरसह २० बळी घेऊन त्याच्या संघासाठी आघाडीचा विकेट घेणारा गोलंदाज आहे.

महमुदुल्लाः बांगलादेशचा उजव्या हाताचा मधल्या फळीतील फलंदाज सात सामन्यांत ५९ च्या सरासरीने आणि ९० च्या स्ट्राइक रेटने २९६ धावा करत त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.

मेहदी हसन मिराज: बांगलादेशच्या प्रतिभावान अष्टपैलू बॅट आणि बॉलने उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्याने आठ सामन्यांत १० विकेट्स घेतल्या आहेत आणि १७२ धावा ठोकल्या आहेत.

 

आकड्यांचा खेळ

  • डेव्हिड वॉर्नरला (६) विश्वचषकात १५०० धावा पूर्ण करण्यासाठी १२ धावांची गरज आहे आणि रोहित शर्माच्या (७) विश्वचषकात सर्वाधिक शतकांची बरोबरी करण्यासाठी एका शतकाची आवश्यकता आहे.
  • मिचेल मार्शला एकदिवसीय क्रिकेटमध्ये २५०० धावा पूर्ण करण्यासाठी २० धावांची गरज आहे
  • मार्कस स्टॉइनिसला एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५०० धावा पूर्ण करण्यासाठी १३ धावांची गरज आहे
  • ग्लेन मॅक्सवेलला विश्वचषकात १००० धावा पूर्ण करण्यासाठी विश्वचषकात १०२ धावांची गरज आहे
  • महमुदुल्लाला विश्वचषकात १००० धावा पूर्ण करण्यासाठी ८८ धावांची गरज आहे
  • लिटन दासला एकदिवसीय क्रिकेटमध्ये २५०० धावा पूर्ण करण्यासाठी २ धावांची गरज आहे

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख:  ११ नोव्हेंबर २०२३

वेळ: सकाळी १०:३० वाजता

स्थळ: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे

प्रसारण: स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टार

 

 

 

(सर्व आकडेवारी ईएसपीएन क्रिकइन्फो वरून घेतली आहे)