पाच वेळा विश्वविजेता ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीसाठी पात्र होण्यापासून फक्त एक विजय दूर आहे. दोन अनपेक्षित पराभवांसह त्यांच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात केल्यानंतर, ऑस्ट्रेलियाने दमदार ‘कमबॅक’ करून पुढील पाच सामने जिंकले. त्यांचा आठवा सामना अफगाणिस्तान या संघाशी होईल जो या स्पर्धेतील ‘डार्क हॉर्स’ आहे. अफगाणिस्ताननी याआधीच गतविजेत्या इंग्लंड, नेदरलँड्स आणि आशियाई पॉवरहाऊस पाकिस्तान आणि श्रीलंका यांचा पराभव केला आहे. त्यांचे यश पाहता ऑस्ट्रेलिया अफगाणिस्तानला अजिबात हलक्यात घेणार नाही. हे विसरू नका की, अफगाणिस्तानलाही त्यांच्या उर्वरित दोन सामन्यांपैकी किमान एक सामना जिंकल्यास उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे.
आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मधील ३९ व्या सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे
ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने
ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांनी २०१२ ते २०१९ दरम्यान एकमेकांविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि ते सर्व ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. भारतात त्यांनी एकमेकांविरुद्ध कधीही एकदिवसीय सामना खेळला नाही. विश्वचषकात, ते दोनदा भेटले आणि दोन्ही वेळेला ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला.
ऑस्ट्रेलिया | अफगाणिस्तान | |
आयसीसी रँकिंग (एक दिवसीय क्रिकेट) | २ | ९ |
एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने | ३ | ० |
विश्वचषकात | २ | ० |
आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मधील ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानची आतापर्यंतची कामगिरी
ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये आपला आठवा सामना खेळतील. सात सामन्यांपैकी ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने गमावल्यानंतर पाच जिंकले आहेत, तर अफगाणिस्तानने चार जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाने त्यांचे शेवटचे तीन सामने स्कोअरचा बचाव करताना जिंकले आहेत, तर अफगाणिस्तानने लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांचे शेवटचे तीन सामने जिंकले आहेत.
सामना क्रमांक | ऑस्ट्रेलिया | अफगाणिस्तान |
१ | भारताकडून ६ विकेटने पराभव | बांगलादेशकडून ६ विकेटने पराभव |
२ | दक्षिण आफ्रिकेकडून १३४ धावांनी पराभव | भारताकडून ८ विकेटने पराभव |
३ | श्रीलंकेचा ५ विकेटने पराभव | इंग्लंडचा ६९ धावांनी पराभव |
४ | पाकिस्तानचा ६२ धावांनी पराभव | न्यूझीलंडकडून १४९ धावांनी पराभव |
५ | नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव | पाकिस्तानचा ८ विकेटने पराभव |
६ | न्यूझीलंडचा ५ धावांनी पराभव | श्रीलंकेचा ७ विकेटने पराभव |
७ | इंग्लंडचा ३३ धावांनी पराभव | नेदरलँड्सचा ७ विकेटने पराभव |
संघ
ऑस्ट्रेलिया: पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, शॉन अॅबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लाबूशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.
अफगाणिस्तान: हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झदरन, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमातुल्ला ओमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी, अब्दुल रहमान, नवीन उल हक.
दुखापती अपडेट्स
इंग्लंडचा सामना न खेळलेले ऑस्ट्रेलियाचे अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल मार्श निवडीसाठी उपलब्ध आहेत. गोल्फ कार्टमधून पडल्यानंतर झालेल्या दुखापतीमुळे मॅक्सवेल बाहेर गेला होता, तर मार्शला त्याच्या आजारी आजोबांना भेटण्यासाठी ऑस्ट्रेलियाला परतावे लागले, ज्यांचे शुक्रवारी दुःखद निधन झाले.
खेळण्याची परिस्थिती
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना होणार आहे. हा दिवस-रात्र सामना असेल. या स्पर्धेतील चौथा सामना या ठिकाणी खेळवला जाईल. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी येथे खेळलेले पहिले तीन सामने मोठ्या फरकाने जिंकले आहेत. पहिल्या डावात फलंदाजीसाठी परिस्थिती अनुकूल आहे. दुसऱ्या डावात, जेव्हा खेळ लाईट्स खाली खेळला जातो तेव्हा वेगवान गोलंदाजांना नवीन चेंडूने अतिरिक्त स्विंग मिळण्याची शक्यता असते.
हवामान
हवामान खूप उबदार राहण्याची अपेक्षा आहे. दिवसभरात कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस राहील. ६०% ढगांचे आच्छादन आणि १% पावसाची शक्यता असेल. दक्षिण-आग्नेयेकडून वारे वाहतील.
कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे
डेव्हिड वॉर्नर: धडाकेबाज ऑस्ट्रेलियन सलामीवीर त्याच्या संघासाठी ६१ च्या सरासरीने आणि ११२ च्या स्ट्राईक रेटने ४२८ धावा करून त्याच्या संघासाठी आघाडीवर आहे. तो खेळाची सुरुवात उत्कृष्ट करून देत आहे.
अॅडम झाम्पा: ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर सात सामन्यांमध्ये तीन फोर-फर घेऊन 19 विकेट्ससह चांगली कामगिरी करत आहे. त्याच्या आजूबाजूला प्रसिद्ध वेगवान त्रिकूट असूनही, या चतुर फिरकी गोलंदाजाने स्वत:साठी एक ठसा उमटवला आहे.
हशमतुल्ला शाहिदी: तो अफगाणिस्तानचा कॅप्टन कूल आहे. त्यांनी त्याच्या संघाच्या फलंदाजीची कमान सांभाळली आहे. या उजव्या हाताच्या मधल्या फळीतील फलंदाजाने सात सामन्यांमध्ये ७१ च्या सरासरीने आणि ७५ च्या स्ट्राइक रेटने २८२ धावा केल्या आहेत.
राशिद खान: तो अफगाणिस्तानचा जादूई फिरकी गोलंदाज आहे. सात सामन्यांमध्ये त्याने सात विकेट्स घेतल्या आहेत. तो सर्वात कठीण गोलंदाजांपैकी एक आहे. याशिवाय, तो खालच्या फळीत फलंदाजी करण्यास अधिक सुलभ आहे.
आकड्यांचा खेळ
- डेव्हिड वॉर्नरला (६) विश्वचषकात सर्वाधिक शतके करणाऱ्या रोहित शर्माच्या (७) बरोबरीसाठी एका शतकाची गरज आणि विश्वचषकात १५०० धावा पूर्ण करण्यासाठी ८० धावांची आवश्यकता
- मिचेल मार्शला एकदिवसीय क्रिकेटमध्ये २५०० धावा पूर्ण करण्यासाठी ४४ धावांची गरज
- मार्कस स्टॉइनिसला एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५०० धावा पूर्ण करण्यासाठी १९ धावांची गरज
सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: ७ नोव्हेंबर २०२३
वेळ: दुपारी २: ०० वाजता
स्थळ: वानखेडे स्टेडियम, मुंबई
प्रसारण: स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टार
(सर्व आकडेवारी ईएसपीएन क्रिकइन्फो वरून घेतली आहे)