आकाश कंदील आणले ‘जमिनीवर’

ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 9 ते 15 नोव्हेंबर या कालावधीमध्ये दिवाळी हा सण-उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. या काळात हौशी नागरिक पेटते कंदील आकाशात सोडत असतात. त्यावर जिल्हा प्रशासनाने बंदी आणली आहे.

दिवाळी उत्सवाच्या अनुषंगाने काही जण आकाश कंदिल प्रज्वलित करून हवेत सोडतात. परिणामी हे पेटते कंदिल जमिनीवर येऊन एखादी अनुचित गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हवेत प्रज्वलित करून सोडण्यात येणाऱ्या आकाश कंदिल उडवण्यावर, विक्रीवर किंवा साठा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

त्यानुषंगाने 9 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत ठाणे आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीमध्ये प्रज्वलित आकाश कंदील हवेत सोडण्यावर व विक्री करण्यावर विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांनी मनाई आदेश लागू केले आहेत. या आदेशाचे उल्लघंन झाल्यास फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे.