सलग तीन अपयशानंतर पाकिस्तान भिडणार आत्मविश्वासपूर्ण दक्षिण आफ्रिकेला

Photo credits: PTI

जर तुम्ही दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटचे चाहते असाल तर कदाचित तुमच्या आनंदाला पारावार उरणार नाही. दक्षिण आफ्रिकेच्या शांत आणि संयोजित खेळाडूंनी आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय भूमीवर पाऊल ठेवल्यापासून काहीही चुकीचे केले नाही. नेदरलँड्सचा तो अनपेक्षित सामना बाजूला ठेवला तर, प्रोटीजने सर्व काही अचूक केले आहे आणि गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आपले स्थान बळकट केले आहे. त्यांचा पुढील सामना पाकिस्तानशी होईल, ज्या संघाला बऱ्याच समस्या आहेत. त्यांची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सामान्य दिसत आहे. पहिले दोन पेपर चांगल्या मार्काने पास झाल्यावर अचानक पाकिस्तान मागील तीन पेपर लिहताना यशाचा फॉर्मुला विसरले असे दिसून आले. काय १९९२ चा विश्वविजेता दक्षिण आफ्रिकेला त्यांचा सलग तिसरा विजय नोंदवण्यापासून रोखू शकतात?

आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ चा २६ वा सामना दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात २७ ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल.

 

दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने

दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांनी १९९२ ते २०२१ दरम्यान एकमेकांविरुद्ध ८२ एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी दक्षिण आफ्रिकेने ५१ जिंकले आहेत, पाकिस्तानने ३० जिंकले आहेत, आणि एका सामन्याचा निकाल लागला नाही. भारतात, त्यांनी एक एकदिवसीय सामना खेळला आहे, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने २००६ मध्ये १२४ धावांनी विजय मिळवला. विश्वचषक स्पर्धेत, दक्षिण आफ्रिकेने तीन जिंकले आहेत आणि दोन गमावले जेव्हा २०१५ आणि २०१९ मध्ये पाकिस्तानने विजय मिळवला होता.

  दक्षिण आफ्रिका पाकिस्तान
आयसीसी रँकिंग (एक दिवसीय क्रिकेट)
एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने ५१ ३०
एक दिवसीय क्रिकेटमध्ये (भारतात)
एक दिवसीय क्रिकेटमध्ये (विश्वचषकात)

 आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मधील दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान आतापर्यंतची कामगिरी

आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड आपला सहावा सामना खेळतील. पाच पैकी, दक्षिण आफ्रिकेने चार जिंकले आणि एक गमावला, तर पाकिस्तानने दोन जिंकले आणि तीन सामने गमावले.

सामना क्रमांक दक्षिण आफ्रिका पाकिस्तान
श्रीलंकेचा १०२ धावांनी पराभव नेदलँड्सचा ८१ धावांनी पराभव
ऑस्ट्रेलियाचा १३४ धावांनी पराभव श्रीलंकेचा ६ विकेटने पराभव
नेदलँड्सकडून ३८ धावांनी पराभव भारताकडून ७ विकेटने पराभव
इंग्लंडचा २२९ धावांनी पराभव ऑस्ट्रेलियाकडून ६२ धावांनी पराभव
बांगलादेशचा १४९ धावांनी पराभव अफगाणिस्तानकडून ८ विकेटने पराभव

संघ

दक्षिण आफ्रिका: टेम्बा बावुमा (कर्णधार), जेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को यानसन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अँडिले फेहलुक्वायो, कगिसो रबाडा, तबरेझ शम्सी, रासी व्हॅन डर ड्युसेन, लिझाद विल्यम्स.

पाकिस्तान: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम. 

 

दुखापती अपडेट्स

दक्षिण आफ्रिकेचा नियमित कर्णधार टेंबा बावुमा आजारपणामुळे शेवटचे दोन सामने खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत एडन मार्करमने दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले आहे. बावुमा पाकिस्तान सामन्यासाठी फिट नसल्यास, मार्करम संघाचे नेतृत्व करेल. पाकिस्तानसाठी, डावखुरा सलामीवीर फखर जमान, जो या विश्वचषकात फक्त एक सामना खेळला आहे, तो गुडघ्याच्या दुखापतीमुळे उर्वरित चार सामन्यांना मुकला. दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यापूर्वी तो सराव सत्राचा भाग असण्याची शक्यता आहे. संघात आलेल्या अब्दुल्ला शफीकने चार सामन्यांत २५५ धावा केल्या आहेत, हे पाहता जमान फिट झाल्यावर, तो कोणाची जागा घेतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

 

खेळण्याची परिस्थिती

चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होणार आहे. हा दिवस-रात्र सामना असेल. या स्पर्धेतील पाचवा आणि शेवटचा सामना हे ठिकाण आयोजित करेल. येथे खेळल्या गेलेल्या चार सामन्यांपैकी प्रथम फलंदाजी करणार्‍या संघांनी एक जिंकला आणि दुसर्‍या डावात फलंदाजी करणार्‍या संघांनी तीन जिंकले. या मैदानावर सर्वाधिक धावसंख्या २८८ आणि सर्वात कमी १३९. फलंदाजीसाठी परिस्थिती चांगली राहील. तथापि फिरकी गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची असू शकते.

 

हवामान

हवामान दमट राहण्याचा अंदाज आहे. दिवसभरात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. ७१% ढगांचे आच्छादन आणि ४% पावसाची शक्यता असेल. ईशान्येकडून वारे वाहतील.

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

मुंबईत बांगलादेशविरुद्धच्या मागील सामन्यात १७४ धावा करून, दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा सलामीवीर क्विंटन डी कॉक पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेईल. ८१ च्या सरासरीने आणि ११५ च्या स्ट्राईक रेटसह ४०७ धावा करून तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. याशिवाय, कगिसो रबाडा, मार्को यानसन आणि जेरल्ड कोएत्झी या वेगवान त्रिकूटानेही प्रत्येकी १० विकेट्स घेऊन प्रभावी कामगिरी केली आहे.

पाच सामन्यांमध्ये ३०२ धावा करून, पाकिस्तानचा यष्टिरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवान हा या विश्वचषकात त्याच्या संघासाठी सर्वात प्रभावी ठरला आहे. त्याची सरासरी ७६ आहे आणि त्याचा स्ट्राईक रेट ९६ आहे. त्याच्या व्यतिरिक्त शाहीन आफ्रिदी, जो आज आपला ५०वा एकदिवसीय सामना खेळणार आहे तो चेंडूने लक्षणीय योगदान करेल अशी अपेक्षा आहे. तो नवीन चेंडूने चांगली गोलंदाजी करत आहे. त्याने पाच सामन्यांमध्ये १० विकेट्स घेतल्या आहेत, ज्यात एका फायफरचा समावेश आहे.

Photo credits: AFP

 

 

 

 

 

 

 

आकड्यांचा खेळ

  • एडन मार्करमला एकदिवसीय क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण करण्यासाठी ७० धावांची गरज
  • क्विंटन डी कॉक (३) विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक शतके करणाऱ्या एबी डिव्हिलियर्सच्या बरोबरीपासून (४) एक शतक दूर आहे.
  • मोहम्मद रिझवानला एकदिवसीय क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण करण्यासाठी ५ धावांची गरज
  • हसन अलीला एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०० विकेट्स पूर्ण करण्यासाठी १ विकेटची आवश्यकता
  • शाहीन आफ्रिदी आपला ५० वा एकदिवसीय सामना खेळणार आहे आणि १०० विकेट्स पासून ४ विकेट्स दूर

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: २७ ऑक्टोबर २०२३

वेळ: दुपारी २:०० वाजता

स्थळ: एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई

प्रसारण: स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टार

 

 

(सर्व आकडेवारी ईएसपीएन क्रिकइन्फो वरून घेतली आहे)