ठाणे : येथील राममारुती रोडवरील राजमाता वडा आणि ठाणे आग्रा रोडवरील भाटीया कंपाऊंड येथील ओम साईराम फुडस् यांना वागळे इस्टेट येथील अन्न व औषध प्रशासनाने ‘व्यवसाय बंद’चे आदेश दिले आहेत. या आदेशांची सक्त अंमलबजावणी बुधवारी, 18 आॅक्टोबर 2023 पासून करण्यास सांगितले आहे.
एफडीएच्या अन्न परिमंडळचे सहाय्यक आयुक्त श्री. वेदपाठक आणि अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती आडे यांनी संंबंधित व्यावसायिकांच्या व्यवसायांची कसून पाहणी आणि चौकशी केली. व त्यांना ‘व्यवसाय बंद’चे आदेश दिले आहेत.
राजमाता वडा’च्या चमचमीत वड्यांभोवती माशांचा वावर, कर्मचा-यांच्या तपासणीची, कचराकुंडींची वानवा, भांडी धुण्याची बोंब, चटणी, चिवडा, आलूभजी उघड्या भांड्यात ठेवलेले, तब्बल 30 व्यक्ती अन्नपदार्थ हाताळत असून त्यांची संसर्गजन्य रोगांपासून मुक्त असल्याबाबत वैद्यकीय तपासणी झाल्याचा अहवाल दुकानदाराने सादर केला नाही.
ठाणे आग्रा रोडवरील ओम साईराम फुडस् येथेही व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या अन्न सुरक्षा मानदे कायद्यांची ‘ऐशी की तैशी’ झाल्याचे आढळल्यामुळे राजमाता वडा आणि ओम साईराम फुडस् या दोघांनाही अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत नियम व नियमने अंतर्गत बुधवारी, 18 आॅक्टोबर 23 पासून ‘व्यवसाय बंद’करण्याचे निर्देश दिले आहेत.
‘न्यु गजानन वडापाव’ येथे तपासणी केली असता माशांचा वावर, कर्मचा-यांची वैद्यकीय तपासणी, कचराकुंडींची वानवा, भाडी धुण्याची बोंब, स्वयंपाकघरात व बाजूच्या खोलीत फरशी एकसंघ नसल्याचे आणि काही ठिकाणी फुटलेली, स्वयंपाकघरातील अस्वच्छ असल्याच्या तसेच स्वयंपाकघरात व बाहेर भांडी धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करत नसल्याचे आढळून आले, अशा अनेक त्रुटी आढळल्या. तपासणीवेळी तयार केलेल्या अन्नपदार्थांपैकी एकही अन्नपदार्थ मान्यताप्राप्त प्रयोगशाळेकडून तपासून घेतल्याबाबत विश्लेषण अहवाल सादर केला नाही, असेही एफडीएच्या अधिका-यांचे म्हणणे आहे.
ओम साईराम फुड्सनीही जनहित व जनआरोग्य विचारात घेता त्यांनीही केलेल्या सात त्रुटी गंभार आहेत. पिण्यायोग्य पाणी आहे की नाही याचे विश्लेषण केलेल नाही, कामगार रोगमुक्त आहेत की नाही त्याची खातरजमा/ खात्री होण्यासाठी प्राधिकृत वैद्यकीय व्यावसायिकांकडून तपासणी केली नाही, पेस्ट कंट्रोल केले नाही, असे तब्बल 31 मुद्दे तपासणीवेळी काढण्यात आले, असेही श्रीमती आडे यांनी म्हटले आहे.