भारतात एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया विरुद्ध ३-०. आज कोण जिंकणार?

Photo credits: AFP/AP

आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ चा १० वा सामना १२ ऑक्टोबर रोजी लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर पाच वेळा विश्वचषक विजेते ऑस्ट्रेलिया आणि चार वेळा उपांत्य फेरीतील दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जाईल.

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेने १९९२ पासून एकमेकांविरुद्ध १०८ एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी ऑस्ट्रेलियाने ५० जिंकले आहेत, दक्षिण आफ्रिकेने ५४ जिंकले आहेत, तीन सामने बरोबरीत संपले आणि एकाचा निकाल लागला नाही. या दोन संघांनी भारतात एकमेकांविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळले आणि दक्षिण आफ्रिकेने सर्व जिंकले आहेत. विश्वचषक स्पर्धेत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका १९९२ ते २०१९ दरम्यान सहा वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने तीन वेळा विजय मिळवला, दक्षिण आफ्रिकेने दोन वेळा. आणि १९९९ मधील तो संस्मरणीय सामना बरोबरीत संपला होता.

  ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका
आयसीसी रँकिंग (एक दिवसीय क्रिकेट)
एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने (विजय) ५० ५४
भारतात (विजय)
विश्वचषकात (विजय)

आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मधील ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेची आतापर्यंतची कामगिरी

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ च्या मोहिमेत विरोधाभासी सुरुवात केली आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना खेळला आहे. दक्षिण आफ्रिकेने दिल्ली येथे श्रीलंकेचा ४२८ धावा करून १०२ धावांच्या मोठ्या फरकाने सकारात्मक सुरुवात केली, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला चेन्नईत भारताकडून सहा विकेट्सने निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले. त्या सामन्यात ऑस्ट्रेलिया १९९ धावांवर बाद झाले.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान: संघ, दुखापती अपडेट्स, खेळण्याची परिस्थिती, हवामान आणि कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायची गरज आहे

संघ

ऑस्ट्रेलिया: पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, शॉन अॅबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लाबूशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.

दक्षिण आफ्रिका: टेम्बा बावुमा (क), जेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को यानसन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अँडिले फेहलुक्वायो, कगिसो रबाडा, तबरेझ शम्सी, रासी व्हॅन डर ड्युसेन, लिझाद विल्यम्स.

दुखापती अपडेट्स

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कस स्टॉइनिस हा हॅमस्ट्रिंगच्या समस्येने त्रस्त होता आणि त्यामुळे चेन्नईमध्ये भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो गोलंदाजीसाठी फिट नव्हता. जर तो फिट झाला तर तो झुंझत असलेल्या कॅमेरॉन ग्रीनच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रवेश करू शकतो. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेत फिटनेसची कोणतीही समस्या नाही.

खेळण्याची परिस्थिती

लखनौ येथील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना होणार आहे. हा दिवस-रात्र सामना असेल. ऑस्ट्रेलिया येथे आपला पहिला एक दिवसीय सामना खेळणार आहे, तर दक्षिण आफ्रिकेने गेल्या वर्षी येथे एक खेळला आहे ज्यात भारताला त्यांनी नऊ धावांनी पराभूत केले. या विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना या ठिकाणी होणार आहे. यापूर्वी, येथे २०१९ आणि २०२२ दरम्यान चार एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यात प्रथम फलंदाजी आणि दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकले. येथे सर्वाधिक धावसंख्या एकूण २५३ आणि सर्वात कमी १९४ अशी आहे. लखनौमध्ये, काळी माती आणि लाल मातीच्या खेळपट्ट्या आहेत, त्यापैकी काळ्या मातीच्या खेळपट्ट्या फिरकी गोलंदाजांना मदत करतात आणि लाल माती वेगवान गोलंदाजांना.

हवामान

हवामान धुके राहण्याची शक्यता आहे. दिवसभरात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. ढगांचे आच्छादन राहणार नाही आणि पावसाची शक्यता नाही. पश्चिमेकडून वारे वाहतील.

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

ऑस्ट्रेलियाने त्यांच्या विश्वचषक मोहिमेची निराशाजनक सुरुवात केली असेल, परंतु पाच वेळच्या चॅम्पियन्सकडून पुन्हा मजबूत पुनरागमन होईल अशी अपेक्षा आहे. संघातील दोन सर्वात अनुभवी फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांच्याकडून संघाच्या फलंदाजीची जबाबदारी स्वीकारण्याची अपेक्षा आहे. या दोघांनी भारताविरुद्ध चांगली खेळी केली. वॉर्नरने ४१ धावा केल्या तर स्मिथने ४६. गोलंदाजांमध्ये, जोश हेझलवूडने नऊ षटकांत, ज्यामध्ये एका मेडनचा समावेश होता, ३८ धावा देऊन तीन बळी घेतले. त्याने नवीन चेंडूने उत्कृष्ट गोलंदाजी केली.

दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या विश्वचषक मोहिमेची ह्याच्याहून चांगली सुरुवात एखादवेळी करता आली नसती. त्यांनी ४२८ धावा केल्यानंतर श्रीलंकेचा १०२ धावांनी पराभव केला. क्विंटन डी कॉक, रॅसी व्हॅन डर ड्यूसेन आणि एडन मार्कराम या तीन फलंदाजांनी शतकीय पारी खेळली. फलंदाजांप्रमाणेच गोलंदाजांनी देखील प्रभावित केले विशेषत: जेराल्ड कोएत्झी ज्याने नऊ षटकांत ६८ धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या.

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: १२ ऑक्टोबर २०२३

वेळ: दुपारी २:०० वाजता

स्थळ: भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम, लखनौ

प्रसारण: स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टार

 

 

(सर्व आकडेवारी ईएसपीएन क्रिकइन्फो वरून घेतली आहे)