आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ चा सातवा सामना १० ऑक्टोबर रोजी धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यात खेळवला जाईल.
इंग्लंड आणि बांगलादेश एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने
इंग्लंड आणि बांगलादेश साल २००० पासून एकमेकांविरुद्ध २४ एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी इंग्लंडने १९ जिंकले आहेत तर बांगलादेशने केवळ पाच. एकूण एक दिवसीय क्रिकेटमधील आकडे जरी इंग्लंडच्या बाजूने असले तरी जेव्हा विश्वचषकांचा विचार केला जातो, तेव्हा ते अगदी बरोबरीचे आहेत. इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यातील चार सामन्यांपैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी दोनदा विजय मिळवला आहे. हे दोन्ही संघ पहिल्यांदाच एकदिवसीय सामन्यात भारतात एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत.
आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मधील इंग्लंड आणि बांगलादेशची आतापर्यंतची कामगिरी
आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये इंग्लंड आणि बांगलादेश यांनी प्रत्येकी एक सामना खेळला आहे. एकीकडे इंग्लंडला गेल्या आवृत्तीच्या दुसरा सर्वोत्तम संघ न्यूझीलंडकडून नऊ विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला जेव्हा त्यांनी अहमदाबादमध्ये २८२ धावांचा बचाव नाही केला, तर दुसरीकडे बांगलादेशने त्यांच्या मोहिमेची सुरुवात दमदार झाली जेव्हा त्यांनी त्यांचा पहिला सामना धर्मशाला येथे १५७ धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानविरुद्ध सहा गडी राखून जिंकला.
इंग्लंड आणि विरुद्ध बांगलादेश: संघ, दुखापती अपडेट्स, खेळण्याची परिस्थिती, हवामान आणि कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायची गरज आहे
संघ
इंग्लंडः जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियम लिव्हिंगस्टन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, मार्क वुड, ख्रिस वोक्स.
बांगलादेशः शाकिब अल हसन (कर्णधार), लिटन दास, तन्झिद हसन तमीम, नजमुल हुसेन शांतो, तौहिद हृदोय, मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह रियाद, मेहिदी हसन मिराझ, नसुम अहमद, शाक मेहेदी हसन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, शोरीफुल इस्लाम, तनझिम हसन साकिब.
दुखापती अपडेट्स
इंग्लंडचा उत्कृष्ट फलंदाज बेन स्टोक्स अजूनही नितंबच्या दुखापतीतून सावरत असल्याने बांगलादेशविरुद्धच्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. ५ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंडच्या सलामीच्या सामन्यात देखील स्टोक्स उपस्थित नव्हता. दुसरीकडे, बांगलादेशचा संपूर्ण संघ इंग्लंडविरुद्धच्या त्यांच्या आगामी सामन्यात निवडीसाठी उपलब्ध असेल.
खेळण्याची परिस्थिती
धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यातील सामना सकाळी १०:३० वाजता सुरू होईल. दोन्ही संघांनी यापूर्वी येथे एक-एक सामना खेळला आहे आणि ते विजयी झाले आहेत. हे ठिकाण या विश्वचषकातील दुसऱ्या सामन्याचे आयोजन करेल. मागील सामन्यात, दुसऱ्या फलंदाजी करणाऱ्या संघाने १५७ धावांचा पाठलाग करताना सहा विकेट्स राखून विजय मिळवला. बॅट आणि बॉल यांच्यात एक रोमांचक स्पर्धा होऊ शकते. या खेळ पट्टीवर स्पिनर्सची भूमिका महत्वाची असेल.
हवामान
हवामान अंशतः सूर्यप्रकाश आणि थंड राहण्याचा अंदाज आहे. दुपारी एक पावसाची सर येऊ शकते. दिवसभरात कमाल तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. ढगांचे आच्छादन २९%, पावसाची संभावना ६५% आणि वादळाची शक्यता १९% असेल. पूर्व-आग्नेयेकडून वारे वाहतील.
कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे
इंग्लंडच्या संघात असणारा एक अनुभवी फलंदाज जो रूट याच्यावर सर्वांच्या नजर असतील. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा रूट यानी ५ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरुद्धच्या मागच्या सामन्यात आपल्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. उजव्या हाताच्या या फलंदाजाने ८६ चेंडूंत चार चौकार आणि एका षटकारासह ७७ धावा केल्या. त्याच्या फलंदाजीव्यतिरिक्त, तो त्याच्या ऑफ स्पिनसह चेंडूने देखील उपयुक्त आहे. न्यूझीलंडविरुद्ध जरी इंग्लंडची गोलंदाजी निराशाजनक दिसली तरी त्यांच्या आक्रमणात पुरेसा डंका आहे. अतिशय जलद गतीने गोलंदाजी करणारा मार्क वुड, अचूक टप्प्यासाठी जाणला जाणारा ख्रिस वोक्स, गती परिवर्तन करण्याची आणि कटर्स टाकण्याची ज्याची ख्याती आहे तो सॅम करन आणि आदिल रशीद, मोईन अली आणि लियाम लिव्हिंगस्टन चे फिरकी त्रिकूट कमाल आहे.
बांगलादेशसाठी अष्टपैलू खेळाडू मेहदी हसन मिराझने अफगाणिस्तानविरुद्धच्या मागच्या सामन्यात प्रभावी कामगिरी केली. उजव्या हाताच्या ऑफ स्पिनरने नऊ षटकांत तीन मेडन्ससह २५ धावा देऊन तीन बळी घेतले. नंतर फलंदाजी करताना, या २५ वर्षीय उजव्या हाताच्या आघाडीच्या फलंदाजाने ७३ चेंडूत ५७ धावा केल्या, त्यात पाच चौकारांचा समावेश होता. मिराझ व्यतिरिक्त, बांगलादेशचा उपकर्णधार नजमुल हुसेन शांतो यानी आपल्या मागच्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध तीन चौकार आणि एका षटकारासह ८३ चेंडूत नाबाद ५९ धावा करून आपण चांगल्या फॉर्म मध्ये असल्याच्या दाखवले.
सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: १० ऑक्टोबर २०२३
वेळ: सकाळी १०:३० वाजता
स्थळ: हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धर्मशाला
प्रसारण: स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टार
(सर्व आकडेवारी ईएसपीएन क्रिकइन्फो वरून घेतली आहे)