आशियाई तायक्वांदो स्पर्धेत प्रिशा शेट्टीने पटकावले कांस्यपदक

कल्याण : लेबनॉन येथे नुकत्याच झालेल्या आशियाई कॅडेट तायक्वांदो स्पर्धेत साताराची तायक्वांदोपटू प्रिशा शेट्टी हिने ऐतिहासिक कामगिरी नोंदवत कांस्यपदक पटकावले तसेच महाराष्ट्राला कॅडेट गटात आंतरराष्ट्रीय पदक मिळवून देणारी प्रिशा ही पहिली खेळाडू ठरली आहे.

प्रिशा शेट्टी ही गेल्या ८-९ वर्षांपासून कराड येथील ए. पी. स्पोर्टस अकादमी अगाशीवनगर या ठिकाणी तायक्वांदोचे प्रशिक्षण घेत आहे. प्रशिक्षक अक्षय खेतमर व अमोल पालेकर यांचे प्रिशाला मार्गदर्शन लाभले.

आंतरराष्ट्रीय स्पर्धा आटपून मुंबई येतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आगमन झाल्यानंतर राज्यातील अनेक तायक्वांदो प्रशिक्षक आणि खेळाडूंनी प्रीशाचे अभिनंदन आणि स्वागत केले. इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली एशियन तायक्वांदो स्पर्धेमध्ये भारतीय संघ सामील झाला. भारतीय खेळाडूंनी स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त करत 5 पदके ही पटकावली. त्यामधीलच महाराष्ट्राच्या प्रिक्षा शेट्टी यामध्ये समावेश आहे.

मुंबई ते सातारा अशा प्रवासामध्ये तिचं मुंबई रायगड पनवेल पुणे लोणावळा कराड सातारा येथे जल्लोषात स्वागत आणि सत्कार करण्यात आले. तायक्वांदो राज्यचे अध्यक्ष अनिल झोडगे, महासचिव संदीप ओंबासे, दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते भास्कर करकेरा, तामचे सीईओ गफार पठाण, डॉ प्रसाद कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक उषा शिर्के आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.