ठाणे: भाजप प्रदेश प्रवक्ते सागर भदे यांची सलग तिसऱ्यांदा भाजप ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अॅड. संदीप लेले, आमदार निरंजन डावखरे यांच्या कार्यकाळात उपाध्यक्ष पद भुषविलेल्या सागर भदे यांच्यावर नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी देखील पुन्हा विश्वास दाखवला आहे. पक्षाचा हा विश्वास सार्थ ठरविण्याचा मनोदय उपाध्यक्ष सागर भदे यांनी बोलुन दाखवला.
ठाणे शहर भारतीय जनता पक्षाच्या खोपट मध्यवर्ती कार्यालयातुन विविध वर्तमानपत्रे, प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमे यांच्यामधील भाजपचा दुवा म्हणुन कार्यरत असलेल्या सागर भदे यांच्या पक्षाप्रती समर्पण आणि परिश्रमाची दखल पक्षाने घेतल्याचे दिसुन येते. भारतीय जनता पक्षात यापुर्वीही शहर उपाध्यक्षपदी कार्यरत असताना सागर भदे यांनी, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे तसेच आमदार संजय केळकर आणि आमदार अॅड. निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना तसेच पक्षाच्या भूमिका सातत्याने मांडल्या आहेत. याशिवाय भारतीय जनता पक्ष आणि विविध प्रकोष्ठ मार्फत ठाण्यात राबवण्यात येणाऱ्या सांस्कृतिक तसेच, राजकीय सामाजिक घडामोडींवरील कार्यक्रमांमध्येही सागर भदे यांचा नेहमीच सहभाग असतो. ठाणे शहर उपाध्यक्षपदी झालेल्या पुर्ननियुक्तीमुळे भाजप परिवारामधुन सागर भदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.