कल्याण: कल्याण पूर्व भागातील एका महाविद्यालयाच्या बाहेरील रस्त्यावर तीन जणांनी एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. बुधवारी दुपारी हा प्रकार कमलादेवी महाविद्यालयाच्या बाहेरील सार्वजनिक रस्त्यावर घडला.
आपली कोणतीही चूक नसताना टोळक्याने मारहाण केल्याने विद्यार्थ्याने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.
सौरव सोनोने (२२) रा. जरीमरी मंदिराजवळ, तिसगाव असे मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, तक्रारदार सौरव बुधवारी दुपारी तीन वाजता आपल्या मित्रांसह कमलादेवी महाविद्यालयाच्या बाहेर सार्वजनिक रस्त्यावर उभा होता. मित्रांबरोबर बोलत असताना आरोपी कृष्णा सोनकर या त्याच्या सहकाऱ्याने काही कारण नसताना सौरव सोनोनेला बाजुलाच उभ्या असलेल्या तीन जणांच्या दिशेने जोराने ढकलले. सौरव टोळक्याच्या अंगावर जाऊन पडला. काही कारण नसताना सौरवमुळे त्रास झाल्याने संतप्त झालेल्या तीन जणांनी सौरवला लोखंडी सळईने बेदम मारहाण केली. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.