ठाणे : भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या व्हायरल झालेल्या कथित व्हिडिओनंतर मंगळवारी संतप्त झालेल्या ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले.
ठाण्यातील चिंतामणी चौकात सोमय्या यांचा फोटो असलेल्या फलकाला जोडे मारण्यात आले. तसेच त्यांचा फलक पायाखाली तुडवण्याचा प्रयत्न करून विकृत प्रदर्शनाचा जाहीर निषेध केला. यावेळी सोमय्या यांना अटक करा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. दरम्यान सोमय्या यांचा प्रतिकात्मक पोलिसांनी तो पुतळा ताब्यात घेतला.
शिवसेनेचे (उबाठा) खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, शहराध्यक्ष प्रदीप शिंदे, प्रकाश पायरे, महिला आघाडीच्या रेखा खोपकर यांच्यासह.महिला कार्यकर्त्या आणि पदाधिकारी उपस्थित होत्या.
व्हायरल झालेला व्हिडिओ हा निंदनीय आहे. याची चौकशी व्हावी तसेच कारवाई करावी, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे, असे खा. राजन विचारे यांनी सांगितले.