टेलिग्राम अ‍ॅपवर अ‍ॅड केले; सात लाख 57 हजार रुपये गेले

टिळकनगर पोलिसांत गुन्हा दाखल

ठाणे : डोंबिवली पूर्व येथे राहणा-या महिलेला नोकरी असतानाही तिने अनोळखी ‘टेलिग्राम अ‍ॅप’ला प्रतिसाद दिल्यानंतर तिचे सात लाख ५७ हजार रुपये ‘हातोहात’गेल्यामुळे तिला हात चोळावा लागला आणि टिळकनगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार द्यावी लागली.

18 जून 2023 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी सहाच्या दरम्यान, फिर्यादी महिलेला (38) यांना कोणीतरी एक अनोळखी मोबाईलधारक महिला आणि व्यक्तीने व्हॉट्सअ‍ॅप कॉल करून, पार्टटाईम जॉबबाबत माहिती दिली आणि टेलिग्राम अ‍ॅपवर अ‍ॅड करून त्यात जॉब संदर्भात टास्क दिले. महिलेने टास्क पूर्ण केल्यानंतर टास्कमध्ये चुक केली आहे, असे सांगून फिर्यादींची दिशाभूल केली आणि त्यांच्याकडून एकुण सात लाख 57 हजार रुपये वेळोवेळी विविध बॅक खातेवर व युपीआय आयडीवर ट्रान्सफर करण्यास सांगितले व त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे.

या प्रकाराबाबत फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीवरुन आरोपींविरुध्द माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पी..जी.पिठे हे करीत आहेत.